प्रा.बाळू भंडारे यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान
किनवट : येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालयातील मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक बाळू आनंद भंडारे यांना पीएचडी (डॉक्टरेट) पदवी प्राप्त झाली आहे. यामुळे त्यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर येथे .
“निवडक संतांच्या साहित्यातील पर्यावरण विषयक विचार मूल्यांचा विवेचक अभ्यास” या विषयावर आपला संशोधन प्रबंध सादर केला होता. संत रामदास कला विज्ञान महाविद्यालय, घनसावंगी जिल्हा जालना येथील मधील मराठी विभागाचे प्रोफेसर डॉ मारोती घुगे यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. बाळू भंडारे यांचे पदव्युत्तर शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे झाले असून त्यांचे अनेक संशोधन निबंध व ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. मराठी साहित्य व संशोधन क्षेत्रात त्यांनी सातत्याने मोलाचे योगदान दिले आहे. सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे यांचे डॉ बाळू भंडारे हे सुपुत्र होत.या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानिवार, प्रा. रामप्रसाद तौर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ तुकाराम रोंगटे,डॉ अनुजा पाटील,मुख्याध्यापक व संस्थेचे सचिव कृष्णकुमार नेमानीवार महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रो.डॉ. मार्तंड कुलकर्णी, डॉ. द्वारकाप्रसाद वायाळ, डॉ. सुनील व्यवहारे, प्रा. तपनकुमार मिश्रा, डॉ आण्णासाहेब सोळंके व्यंकट सातूरवार तसेच महाविद्यालयातील व सरस्वती शैक्षणिक संकुलातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .

No comments:
Post a Comment