२२ व्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ना . हेमंत पाटील
नांदेड : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तथा श्री यशवंतराव ग्राम विकास व शिक्षण प्रसारक मंडळ, करकाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या २२ व्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आ. हेमंतभाऊ पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण जीवन, साहित्य आणि संस्कृतीला व्यासपीठ देणाऱ्या या संमेलनात विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात ग्रंथदिंडी, चित्र व ग्रंथ प्रदर्शन, उद्घाटन सोहळा, पुस्तक प्रकाशन, स्मरणिका प्रकाशन, कविसंमेलन, प्रकट मुलाखत, कथाकथन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
संमेलनाच्या विविध समित्यांच्या प्रमुखांची निवड करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून तयारीला सुरुवात झाली आहे. स्वागताध्यक्ष ना .हेमंतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन लोकाभिमुख आणि दर्जेदार करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. यासंदर्भात नुकतीच बैठक पार पडली.
बैठकीस देवीदास फुलारी, अॅड. एल. जी. पुय्यड, प्रा. महेश मोरे, राजू श्रीरामवार, प्रा. धाराशिव शिराळे, इंजि. मिलिंद गायकवाड, इंजि. तानाजी हुस्सेकर, माधवराव रेड्डी तसेच संमेलनाचे संयोजक दिगंबर कदम , राम तरटे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment