घाटंजी येथे अक्षर मानव संवाद.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 29 November 2019

घाटंजी येथे अक्षर मानव संवाद..

घाटंजी येथे अक्षर मानव संवाद सहवासात पत्रकार संजय आवटे येणार
यवतमाळ ( प्रतिनिधी): स्वतःची भाषा, स्वतःचा अभ्यास, स्वतःचं चिंतन आणि स्वतःचे निष्कर्ष असलेले पत्रकार संजय आवटे. पत्रकारितेला मुर्दाड काळ आलेला असताना ती जिवंत ठेवलेल्या दुर्मिळ पत्रकारांपैकी संजय आवटे एक आहेत.
    समाजात राबलेल्या एका मान्यवर, अभ्यासू व्यक्तीला बोलवावं आणि सलग त्या व्यक्तीच्या संगतीत राहावं, त्याला, त्याच्या कामाला समजून घ्यावं आणि आपण, आपला समाज उन्नत होण्यासाठी काही घावतंय का ते शोधावं, असा एक 'संवाद सहवास' नावाचा अनोखा उपक्रम अक्षर मानवकडून नियमित घेतला जातो. या आधीचे संवाद सहवास डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. गणेश देवी,  डॉ. अनिल अवचट, डॉ. तारा भवाळकर, निखिल वागळे, विनायकदादा पाटील, कुमार केतकर, राजदत्त, नागराज मंजुळे, नागेश भोसले, अतुल पेठे, रामदास फुटाणे, हरी नरके यांच्याशी झाले. आता चौदावा संवाद सहवास होतोय पत्रकार, लेखक संजय आवटे यांच्याशी.
    निवांत, शांत ठिकाणी जमावं आणि मनमोकळ्या संवादाचा अनौपचारिक आनंद घ्यावा, विचारमंथन व्हावं असा हा कार्यक्रम आहे. सर्वांना मुक्त प्रवेश. राहणं-जेवणं विनाशुल्क.
      पण खूप लोक नाव नोंदवूनसुद्धा ऐन वेळी येत नाहीत आणि केलेल्या व्यवस्थेत गडबडी होतात. म्हणून प्रवेश फी : अक्षर मानव आजीव सदस्यांना १०० रुपये व इतरांना २०० रुपये. (काही जण देणगी द्यायची इच्छा व्यक्त करतात, ते कार्यक्रमस्थळी येऊन ऐच्छिक देणगी देऊ शकतात.)
नावनोंदणीची मुदत ५ डिसेंबर २०१९.

दिनांक : १४, १५ डिसेंबर २०१९
स्थळ : घाटंजी, जि. यवतमाळ

नावनोंदणी संपर्क -
अभी मंगल : ९४२३०२४४२५
श्रीकांत डांगे : ९८७०५०४०२१

No comments:

Post a Comment

Pages