विधी साक्षरता महाफेरी समारोप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 18 November 2019

विधी साक्षरता महाफेरी समारोप


     सर्वसामान्यापर्यंत कायद्याचं ज्ञान पोहचविणे अत्यंत गरजेचं आहे.  - न्यायाधीश जहांगीर पठाण ; 

                                                      विधी साक्षरता महाफेरी समारोप




किनवट ( प्रतिनिधी ) :
खेड्या -पाड्यात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कायद्याचं ज्ञान पोहचविणे अत्यंत गरजेचं आहे. याकरिताच "न्याय आपल्या दारी पंधरवड्याचं आयोजन" करण्यात येत आहे. असे प्रतिपादन विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश जहांगीर पठाण यांनी केले.
             महाराष्ट्र विधी सेवा समिती प्राधिकरणाच्या अधिनस्त विधी सेवा समिती, किनवट, वकिल संघ, पंचायत समिती, शिक्षण विभाग, बालविकास प्रकल्प, पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता.१६) सकाळी नऊ वाजता आयोजित केलेल्या " विधी साक्षरता महाफेरी " चा समारोप करतांना ते बोलत होते.
             पुढे बोलतांना न्यायाधीश पठाण म्हणाले, देशातील प्रत्येकाला कायद्याची माहिती आहे असं गृहीत धरल्या जातय. परंतु बहुतांश जण यापासून अनभिज्ञ असतात म्हणूनच त्यांच्या हातून नकळत  एखादा गुन्हा घडून जातो. विद्यार्थी जीवनातच न्यायाच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात म्हणून अशा कार्यक्रमाचं आयेजन केल्या जातय. आज पहिल्यांदाच न्यायमंदीर पाहून एक - दोन विद्यार्थ्यांनी जरी या क्षेत्रात आपलं करिअर निवडून उज्ज्वल भवितव्य घडविलं तरी या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं आम्ही समजतो. असेही ते अध्यक्षीय समारोप करतांना म्हणाले.
             याप्रसंगी सहदिवाणी न्यायाधीश जे.एन. जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, तहसिलदार नरेंद्र देशमुख, प्रभारी गट शिक्षणाधिकारी सुदर्शन मेश्राम, पोलिस निरीक्षक मारोती थोरात, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. पंजाब गावंडे, लोकअदालत विधीमंडळ सदस्य के. मूर्ती, माजी प्राचार्य वि. मा. शिंदे, सरकारी वकील अॅड. अशोक पोटे, चव्हाण आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.
              वकील संघाचे सचिव अॅड. दिलीप काळे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे यांनी आभार मानले. राष्ट्रगीत व संविधानाची उहेशिका वाचनानंतर न्यायमंदीराच्या प्रवेशद्वारावर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखून फेरीला प्रारंभ झाला. राजमाता जिजाऊ चौक, छत्रपती शिवराय चौक, नियोजीत राष्ट्रपिता जोतीराव फुले चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे न्याय मंदीरात महाफेरीचा समारोप झाला. जुम्माखान पठाण व अंकुश मुळे यांच्या नेतृत्वात फेरीचं आकर्षण असलेलं महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचं  लेझीम व बँड पथक अग्रभागी होतं. त्यानंतर सेंट मेरीस इंग्लिश स्कूल, सरस्वती विद्यामंदीर, सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या शाळा, श्री बाबासाहेब मुखरे विद्यालय, कास्मॉपॉलीटन विद्यालय, इंदिरा गांधी विद्यालय, जिल्हा परिषद मुलांचे व मुलींचे हायस्कूल या शाळा फेरीत सहभागी झाल्या होत्या.
              याप्रसंगी विस्तार अधिकारी ( पंचायत ) शिंदे, के. मूर्ती, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, सहदिवाणी न्यायाधीश जे.एन. जाधव यांनी आपले विचार मांडले.
              यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी ना.ना. पांचाळ, केंद्र प्रमुख रमेश राठोड, राम बुसमवार, मुख्याध्यापक मुकूंद तिरमनवार, पत्रकार गोकुळ भवरे, साजिद बडगुजर, आशिष देशपांडे, वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. मिलिंद सर्पे, सहसचिव अॅड. राहूल सोनकांबळे, कोषाध्यक्ष अॅड. यशवंत गजभारे, सदस्य अॅड. आकाश कोमरवार, अॅड. सोनू पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
            समारोपानंतर अंगणवाडी कार्यकर्तीं, विद्यार्थी व  शिक्षक यांना प्रत्यक्ष न्यायदान कक्षात नेऊन न्यायदान प्रक्रिया व सुधारित डिजीटल न्यायालयीन कामकाजाची ईत्यंभूत माहिती अॅड. दिलीप काळे यांनी दिली.
            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयातील कार्यालय अधिक्षक किशोर तिरनगरवार, एल. वाय. मिसलवार, मोहन कुलकणी, अनिल धोटे, शिपाई जोंधळे, शेख मकदूम, एस.डी. चव्हाण, पोलिस कर्मचारी उकंडराव राठोड व एस.डी. दोनकलवार आदिंनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages