महाविहार बावरीनगर दाभड येथे ३३ वी अ. भा. बौद्ध धम्मपरिषद १० आणि ११ जानेवारीला .
आचरण शुद्धीसाठी धम्म परिषदांचे सुयोग्य आयोजन आवश्यक -भदंत धम्मसेवकजी महाथेरो यांचे प्रतिपादन
______________________________________
नांदेड (प्रतिनिधी)
माणसाचे आचरण शुद्ध व्हावे, यासाठी बौद्ध धम्म परिषदांचे सुयोग्य आयोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पूज्य भदंत धम्मसेवक महाथेरो यांनी केले.
महाविहार बावरीनगर दाभड- नांदेड येथील महाविहारात धम्मदेसना देताना ते बोलत होते. येत्या पौष पौर्णिमेला दिनांक १० आणि ११ जानेवारी २०२० रोजी महाविहार बावरीनगर दाभड-नांदेड येथे ३३ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद होणार आहे. परिषदेच्या पूर्वतयारी संदर्भात भदंत धम्मसेवकजी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो, भदन्त पंय्यारत्न, भदंत शीलरत्न भदंत संघपाल तसेच महाविहार बावरीनगर दाभड धम्मपरिषद येथे मुख्य संयोजक उपस्थित डॉक्टर एस. पी. गायकवाड यांची उपस्थिती होती.
पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांनी प्रारंभी महाविहार बावरी नगर दाभड येथे मागील 32 वर्षांपासून घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदांच्या आयोजनाचा आढावा घेतला.
या प्रसंगी धम्मदेसना देताना पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथेरो यांनी बौद्ध धम्म परिषदांमधून शुद्ध स्वरूपात धम्माचरणाचा उपदेश व्हावा, अशी भूमिका मांडली.
महाविहार बावरीनगर परिषदेमध्ये गेली 32 वर्षे हा संदेश पोहोचवला जात आहे. त्याचे अनुसरण महाराष्ट्रात तसेच देशात अनेक भागात होत आहे, याबद्दल पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथेरो यांनी समाधान व्यक्त केले.
महाविहार बावरीनगर च्या 33 व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या पूर्वतयारी बैठकीला प्रा. बी. एम. वाघमारे, इंजिनीयर डी.डी. भालेराव, इंजिनीयर यशवंत गच्चे, एस.टी. पंडित, तोलाजी आटकोरे, लक्ष्मण गर्जे, मिलिंद भालेराव, ॲड. डी. एफ. हरदडकर, सी.एम. रावणगावकर, चांगुणाबाई गोणारकर, चंद्रभागाबाई वाठोरे, प्रा. नरवाडे, प्रा. पंडित सोनाळे, पालीमकर, अनिल उबाळे, विकास कदम, आनंद भोरगे आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment