जनवादी महीला संघटनेचे १२ वे राष्ट्रीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत
मुंबई : घटनेचे रक्षण आणि महीलांच्या हक्कासाठी एकत्र येऊ या,संघर्ष करु या व पुढे जाऊ या,या ध्येयाने प्रेरित झालेल्या अखिल भारतीय जनवादी महीला संघटनेचे(AIDWA) १२ वे राष्ट्रीय अधिवेशन दि.२७ ते ३० डिसेंबर या कालावधीत मुंबई च्या भायखळा येथिल साबु सिद्दिक पाॅलिटेक्निक हाॅल येथे होणार आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध पुरोगामी अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या हस्ते होणार आहे.स्वागताध्यक्षा महाराष्ट्र विद्यापीठ प्राध्यापक संघटना (एमफुक्टो) च्या अध्यक्षा प्रा.डाॅ.ताप्ती मुखोपाध्याय या आहेत.अधिवेशनाचे बिज भाषण अखिल भारतीय जनवादी महीला संघटनेच्या (एआयडीडब्लुए),च्या माजी राष्ट्रीय सरचिटणीस व माजी खासदार वृंदा करात या करणार आहेत.
या अधिवेशनाला देशभरातून निवडक प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे अखिल भारतीय जनवादी महीला संघटनेच्या अखिल भारतीय अध्यक्षा माजी खासदार मालिनी भट्टाचार्य व राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे यांनी सांगितले आहे.


No comments:
Post a Comment