नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्या नांदेडात समारोप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 26 December 2019

नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्या नांदेडात समारोप


नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्या नांदेडात समारोप


नांदेड : राष्ट्रीय नाट्य विद्यालय,नवी दिल्ली आणि लोकजागृती संस्था,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप समारंभ  शुक्रवारी (दि.२७) सायंकाळी सात वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.

          समारंभाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत हे करणार आहेत.विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे हे उपस्थित राहणार आहेत.अध्यक्षस्थानी नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बापुराव गजभारे हे राहणार आहेत.यावेळी प्रा.शिवप्रसाद गौड(नवी दिल्ली) , महापौर दिक्षा कपिल धबाले व प्रा.विकास कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
       
           या प्रसंगी राजेंदर सिंग लिखित व प्रा.संगिता टिपले दिग्दर्शित हिंदी नाटक"गंगे सरल बहो"हे नाटक होईल.प्रवेश विनामुल्य असेल.उपस्थित राहण्याचे आवाहन शिबिर संयोजिका तथा राष्टिय नाट्य विद्यालयाच्या प्रा.संगीता टिपले व समवयक तथा लोकजाग‌ती संस्था चंद्रपुरचे अध्यक्ष अनिरुध वनकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages