घरदार सोडून शिक्षणासाठी वास्तव्य करणाऱ्या निवासी तथा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकडे हयगय करू नये
- सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल
किनवट : घरदार सोडून शिक्षणासाठी वास्तव्य करणाऱ्या निवासी तथा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे माता -पिता म्हणून त्यांच्या आहार व स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. या कामी कुणीही हयगय करू नये असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
शुक्रवारी ( दि. १७ ) झालेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यबाधा प्रकरणाच्या अनुषंगाने शनिवारी ( दि. १८ ) एकलव्य मॉडेल रेसिडेंन्शिअल स्कूल, सहस्त्रकुंड येथे पाहणी निमित्त भेट दिली त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त टी. बोराळकर, माजी खासदार डी.बी. पाटील, प्रकल्प स्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष भगवान हुरदुके, तालुका आरोग्य अधिकारीडॉ. संजय मुरमुरे, अन्नसुरक्षा अधिकारी संतोष कनकावार, आरोग्य सहायक सुधाकर भुरे, सुभाष बोंबले आदिंची उपस्थिती होती. या सर्वांनी आजारी विद्यार्थी यांचेशी संवाद साधला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली.
वैद्यकीय अधिकारी डॉ.के.पी. गायकवाड यांनी वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी स्वतःव सोबतच्या सर्व अधिकारी पथकाने स्वयंपाकघर, भोजन, निवास व्यवस्था, क्रीडा संकुल आदी सर्व विभागाची स्वच्छता विषयक बारकाईने तपासणी केली आणि या सर्व ठिकाणी तातडीने संपूर्ण स्वच्छता करून घ्यावी व भविष्यात या बाबी सदैव टापटीप कशा राहतील या विषयी दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या.
" आरोग्य बाधा प्रकरणाच्या निमित्ताने अन्नाचे नमुने घेतले असून त्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच याबाबत उलगडा होईल.
-टी. बोराळकर, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
" पाहणी केली असता असे आढळून येते की, पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम पडला असावा, नमुना घेतलेल्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे.
-डॉ. संजय मुरमुरे, तालुका आरोग्य अधिकारी
No comments:
Post a Comment