नांदेड रेल्वे स्थानकावर शेकडो रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 19 January 2020

नांदेड रेल्वे स्थानकावर शेकडो रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग


 नांदेड रेल्वे स्थानकावर स्वच्छता मोहिमेत शेकडो रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग

नांदेड : आज १९ जानेवारी, २०२० रोजी सकाळी ०७ ते १० वाजे पर्यंत नांदेड रेल्वे स्थानकावर नांदेड रेल्वे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहीम राबविली.

नांदेड रेल्वे स्थानकावर विविध ठिकाणी प्लास्टिक चा कचरा आढळून येत आहे. रेल्वे स्थानकावरील कचरा स्वच्छता कंत्राटदार उचलून स्थानक स्वच्छ ठेवत आहे. यापैकी बऱ्याच प्लास्टिक च्या पिशव्या आणि इतर प्लास्टिक नांदेड रेल्वे स्थानकावरून मुदखेड कडे जात असतांना येणाऱ्या रेल्वेपूलाखाली , रेल्वेपटरी  वर आणि रेल्वेपटरी च्या दोन्ही बाजूस जमा झाला होता.  हा संपूर्ण कचरा आज घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत उचलण्यात आला.

श्री उपिंदर सिंग, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली  श्री दिवाकर  बाबू, वरिष्ठ विभागीय वाणिज्य  व्यवस्थापक, श्री मांगाचारयेळू, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अधिकारी, श्री विनू देव सचिन, विभागीय सुरक्षा आयुक्त , श्री जॉन बेनहर, सहायक विभागीय वाणिज्य  व्यवस्थापक आणि इतर १०० पेक्षा अधिक रेल्वे कर्मचारी या मोहिमेत उत्स्फूर्त पणे सहभागी झाले होते. स्वच्छता मोहिमे नंतर स्वच्छ रेलपटरी पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले. फोटो सोबत जोडला आहे.

श्री उपिंदर सिंग यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे कि कचरा कचरा पेटीतच टाकावा, इतरत्र टाकू नये. तसेच श्री सिंग यांनी कळविले आहे कि अशा प्रकारची स्वच्छता मोहीम नांदेड विभागातील इतर रेल्वे स्थानकावर सुद्धा  घेण्यात येईल. रेल्वे प्रशासन स्वच्छता ठेवण्याचे प्रयत्न करत आहे, प्रवाशांनीही स्वच्छता ठेवावी असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages