जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात किनवट व माहूरला झुकते माप द्या - डाॅ.अशोक बेलखोडे यांची मागणी. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 23 January 2020

जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात किनवट व माहूरला झुकते माप द्या - डाॅ.अशोक बेलखोडे यांची मागणी.

जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात किनवट व माहूरला झुकते माप द्या - डाॅ.अशोक बेलखोडे यांची मागणी.
किनवट : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२० - २०२१ या वर्षाचा आराखडा तयार करतांना आदिवासी व अतिदुर्गम भाग असलेल्या किनवट- माहूर तालुक्याला झुकते माप मिळावे,अशी मागणी मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डाॅ.अशोक बेलखोडे यांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
    निवेदनात डाॅ.बेलखोडे यांनी नमुद केले आहे की, आदिवासी बहुल किनवट-माहूर तालुक्यातील शैक्षणिक, आरोग्य विषयक तसेच इतर मुलभूत समस्यांची सोडवणूक करणे आवश्यक आहे.आदिवासी व बंजारा समाजातील मुलींचे भवितव्य लक्षात घेऊन किनवट येथे नर्सिंग स्कूल सुरु होणे गरजेचे आहे.याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून व मराठवाडा विकास मंडळामार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.
   किनवटच्या एमआयडीसी विद्युत पुरवठा सुरु झाल्यास येथे उद्योगधंदे सुरु होण्यास चालना मिळेल.
    येथे आदिवासी मुलांसाठी मंजुर करण्यात आलेले चालक प्रशिक्षण केंद्र नांदेडला हलविण्यात आले,ते पुन्हा येथे स्थलांतरित करावे.मागासवर्गिय व इतर जमातींच्या मुलांसाठी शासन स्तरांवरुन वसतीगृह  मंजुर करुन त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.स्वतंत्र विज्ञान केंद्रास मान्यता द्यावी.
   मांडवी येथील खान अब्दुल गफार खान नेत्र रुग्णालयाच्या दुरुस्ती साठी २५ लाख रुपये मंजूर करावेत, अतिदुर्गम भागांना जोडणारे रस्ते, छोट्या गावांना जोडणारे पूल दुरुस्त करावेत, जिल्हा परिषद शाळांची क्रीडांगने सुरक्षित व सुव्यवस्थित  करावित,आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडीत औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध करावित.
   किनवटच्या पोस्ट कार्यालयासमोर  असलेल्या जागेत  वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृह निर्माण करावे, आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती करावी.आदिवासी उपयोजनेअंतर्गत शाळा, वसतीगृहे दुरुस्त करावीत.

  1.   क्रीडा संकुल व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी निधी राखिव ठेवावा.याशिवाय  नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत निवडक आरोग्य केंद्रांना प्रसुती रुग्णवाहिका टप्याटप्याने मंजुर कराव्यात, ग्रामीण भागात व्यायाम शाळा, ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी दळणवळणाची सोय करुन तालुका पातळीवर उच्च शिक्षणाची सोय व्हावी.तालुका ठिकाणापेक्षा लहान गावी अकरावी,बारावीचे १०० विद्यार्थि असल्यास तेथे वसतीगृहे निर्माण करावे, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी अभ्यासगट नेमून वेगळा निधि द्यावा, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तसेच उच्चशिक्षणाची  सोय करावी, या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages