- Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 23 January 2020

नांदेड :बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील श्री.साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या एका मागासवर्गीय विद्यार्थिनिवर त्याच शाळेतील शिक्षकांमार्फत झालेले लैंगिक शोषण, बलात्कार प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी समितीस सहकार्य करावे,असे पत्र फुले- शाहु -आंबेडकर-युवा मंच या विद्यार्थि संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दि.२२ ला  देण्यात आले आहे.
   बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या एका मागासवर्गीय विद्यार्थिनिवर त्याच शाळेतील शिक्षक सय्यद रसुल,दयानंद राजुरे यांनी अश्लिल चित्रफित दाखवत तिचा विनयभंग केला व मागील दोन महिन्यांपासून त्या मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केले आहे,असा आरोप पिडित मुलिच्या आईने रामतिर्थ पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करुन केलेला आहे.
  सदर प्रकरण दाबण्यासाठी संस्था चालक, राजकीय पुढारी व अधिकारी सातत्याने करीत आहेत.पोलिस प्रशासन ज्या पद्धतीने चौकशी करत आहे त्या चौकशीवर संशय निर्माण झाला आहे.
  या घटनेची चौकशी करण्यासाठी संघटनेने डाॅ.हर्षवर्धन दवणे,स्वप्निल नरबाग,प्रा.सतिष वागरे,अॅड.अस्मिता वाघमारे,प्रकाश दिपके, शिवाजी गेडेवाड,अक्षय कांबळे,अमोल महिपाळे व प्रशिक गायकवाड या नऊ जणांची समिती नेमली आहे.या समितीचे संयोजक डाॅ.हर्षवर्धन दवणे व स्वप्निल नरबाग हे असणार आहेत.ही समिती सदरील घटनेची सविस्तर माहिती घेऊन आपला अहवाल  अभिप्रायासह संघटनेकडे सादर करणार आहेत.यामुळे या घटनेची सत्यता उघडकीस येणार आहे.
ही समिती जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेणार आहे,तसेच संबंधित अनेक जणांकडून माहीती घेणार असल्याचे संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages