महाराष्ट्र बंद शांततेत यशस्वी करा;
वंचीत बहुजनआघाडीचे आवाहन.
मुंबईत : वंचित बहुजन आघाडीने २४ जानेवारी या तारखेला पुकारलेला बंद हा फक्त CAA,NRC आणि NPR या कायद्याच्या विरोधातच आहे असं कोणीही समजू नये.
1)हा बंद देशाच्या बुडालेल्या अर्थव्यवस्थेविषयी झोपलेल्या सरकरला जाग आणण्यासाठी आणि बुडलेल्या अर्थव्यवस्थेविषयी जागरूक नसलेल्या सर्वसामान्य भारतीय जनतेला जागृत करण्यासाठी आहे.
2)देशात विद्यमान सरकारकडून जाणीवपूर्वक करू घातलेल्या प्रचंड अशा शासकीय संस्थांच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.
3)CAA,NRC,NPR या राष्ट्रविभाजनकारी,राष्ट्रविरोधी कायद्याच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.
(1) सद्य स्थितीत देशाची अर्थअवस्था व्हेंटिलेटर वरती गेली आहे तिला जबाबदार नोटबंदी आणि विद्यमान सरकारचे आर्थिक धोरणे,अर्थव्यवस्थेबद्दल घेतलेले चुकीचे निर्णय आहेत.देशातील प्रमुख बँका सध्या तोट्यात गेल्या आहेत आणि याचा इफेक्ट हा छोट्या-मोठ्या बँकांवर्ती मोठ्या प्रमाणात पडत आहेत आणि काही छोट्या बँका बंद सुद्धा पडत आहेत.आज सरकारकडे कसल्याच प्रकारचा राखिव पैसा (Deposit Money) उपलब्ध नाही जो की देशाच्या समस्यांवर्ती उपयोगात येईल.काही दिवसांपूर्वीच सरकारने RBI कडून तब्बल 1.76 लाख करोड रुपये एवढा निधी घेतला होता तो सर्व निधी या सरकारने संपविला आहे आणि आता पुन्हा यांनी RBI कडे 45 हजार करोड रुपयांची मागणी केली आहे यावरून आम्हाला समजायला हवंय की हे सरकार आर्थिक पटलावर सपशेल अपयशी ठरल आहे या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे.आशा अवस्थेत देशाला चालविण्यासाठीचा जो खर्च लागतो आज तो विद्यमान सरकारकडे उपलब्ध नाही.एवढी भयाण आर्थिक दिवाळखोरी आणि परिस्थिती या सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची केली आहे.पण या मुद्द्यावर देशात कुठेही चर्चा व्हायला तयार नाही ना विरोधकांकडून ना अभ्यासकाकडून ना पत्रकारांकडून ना तज्ञांकडून.यासाठीच हा मुद्दा जनतेच्या मुख्य पटलावर आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने 24 तारखेला बंद पुकारला आहे आपण सर्वांनी देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी जनमानसात जागृती निर्माण व्हावी यासाठी या बंदमध्ये सहभागी होऊन हा बंद शांततेत पाळण्यासाठी प्रयत्न करावेत.
(2) समंध SC,ST,OBC,Minority समाजाला देशाच्या नोकरशाहीत,कर्मचारी वर्गात स्थान मिळाले ते संविधानिक आरक्षणामुळे मग ते क्षेत्र रेल्वेचे असो की सरकारी कारखाने असोत की मग इतर कोणतेही शासकीय ठिकाण किंवा शासकीय संस्था असो.पण विद्यमान सरकार या सर्वच शासकीय संस्थांचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणात करत आहे.खाजगीकरण होण्याचा परिणाम म्हणजे देशात लोकसंख्येने 95% असलेल्या आणि आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या SC,ST,OBC,EBC,Minority समाजाच्या नौकऱ्यांवर गदा आणला जाईल.आणि या 95% वर्गाला कुठल्याही प्रकारच्या शासकीय नौकर्यांमध्ये स्थान मिळणार नाही
SC,ST,OBC,EBC आणि Minority या वर्गाकडे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रमुख कोणताही व्यवसाय नाही.आरक्षणामुळे या वर्गातील तरुणांना लाखो सरकारी नौकाऱ्या भेटायच्या पण आता होत असलेल्या खाजगीकरनामुळे या नौकऱ्या रद्द होतील.या अतिशय गंभीर मुद्द्यावर सुद्धा देशात चर्चा होताना दिसत नाही म्हणूनच याविषयी सुद्धा सर्वसामान्य SC,ST,OBC,EBC आणि Minority समाजात याविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठीच हा 24 तारखेचा बंद आयोजित केला गेला आहे.
शासकीय संस्थांचे खाजगीकरण झाल्यानंतर आमच्या आरक्षणाला काहीही अर्थ राहणार नाही.खाजगीकरण म्हणजे आरक्षण असून नसल्यासारखे होईल.खाजगीकरण म्हणजे आरक्षित वर्गाला कुठेही नौकर्यांची संधी नसणार आहे.
म्हणून यावर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या SC,ST,OBC, EBC आणि Minority वर्गाने कदापिही दुर्लक्ष्य करू नये आणि दुर्लक्षित वर्गाला सुद्धा याविषयी जागरूक करण्यासाठी प्रयत्न करावेत.आणि म्हणूनच कृपया आपणास विनंती आहे की या खाजगीकरनाला आताच विरोध करणे खूप गरजेचे आहे आणि हाच विरोध म्हणून 24 तारखेच्या बंदमध्ये सर्वच SC,ST,OBC,EBC,Minority वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे..
आता राहिला तिसरा मुद्दा
(3) बुडलेली अर्थव्यवस्था,खाजगीकरण या मुद्यापासून भारतीय जनतेला गुमराह करण्यासाठीच या सरकारने संविधानाचा जाहीरपणे उल्लंघन करणारा कायदा देशात आणला आहे त्या CAA,NRC,NPR कायद्याच्या विरोधात सुद्धा हा बंद राहणार आहे.संविधानिक कलम क्र.14,15 आणि 21 सांगत की देशाचं नागरिकत्व कदापीही धर्माच्या आधारावर असायला नको पण या सरकारने आणलेल्या कायद्यात या कलमांच उल्लंघन जाहीरपणे होत आहे म्हणून अशा संविधानिक कलमांचे उल्लंघन करणाऱ्या कायद्याचा विरोध होणे सुद्धा खूप गरजेचे आहे.
देशाला पुन्हा एकदा धर्माच्या नावावर विभाजित होण्यापासून रोखण्यासाठी हा बंद आहे.
Wednesday 22 January 2020
महाराष्ट्र बंद शांततेत यशस्वी करा; वंचीत बहुजनआघाडीचे आवाहन.
Tags
# महाराष्ट्र
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment