२६ जानेवारीपासून राज्यातील शाळांच्या परिपाठात दररोज होणार संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 22 January 2020

२६ जानेवारीपासून राज्यातील शाळांच्या परिपाठात दररोज होणार संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन!


२६ जानेवारीपासून राज्यातील शाळांच्या परिपाठात दररोज होणार संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन!

मुंबईः शाळकरी मुलांमध्ये संविधानाची मूल्ये रुजावित म्हणून महाविकास आघाडी सरकारने येत्या 26 जानेवारीपासून राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्याचे आदेश दिले आहेत. शालेय परिपाठातील इतर विषय वगळून त्याजागी संविधानाच्या  उद्देशिकेचेच वाचन करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

सध्या राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये होत असलेल्या परिपाठातील विषय शाळाच निश्‍चित करतात. या परिपाठातील अन्य विषय वगळून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली होती. त्यामुळे प्रजासत्ताकदिनापासूनच या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संविधानाची मूल्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांत रूजावित, यासाठीच महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.

No comments:

Post a Comment

Pages