गटविकास अधिकारी धनवे यांच्या अध्यक्षतेखाली इस्लापूर येथे ग्रामसेवकांची तालुकास्तरीय बैठक संपन्न…
ईस्लापूर :
किनवट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून या आढावा बैठकीमध्ये ग्रामीण भागातील शौचालयाची कामे पुर्ण करणे, महाराष्ट्र ग्रामीण योजने अंतर्गत विहरीचे कामे पुर्णतत्वास नेणे, गावपातळीवरील पाणी शुध्दीकरण करणे, तसेच त्याठिकाणी टिसीएलची उपलब्धता करून देणे, ग्रामपंचायत स्तरावर शासवत आराखडा तयार करणे, गाव हागणदारीमुक्त टप्पा क्रमांक दोन साठी ग्रामसेवकानी पुढाकार घेणे, घरकुल लाभार्थी निहाय कामे पुर्णतत्वास नेणे, जन्ममृत्यू अहवाल शंभर टक्के देने, चौदाव्या वित्त आयोगाची जमाखर्चांच्या नोदी व पधराव्या वित्तआयोगाचा कृती आराखडा तयार करणे,अशा विविध विषयांवर गटविकास अधिकाऱ्याच्या माध्यामातून प्रकाशझोत टाकण्यात आला.
या कामामध्ये कुठल्याही ग्रामसेवकांनी कुचराई केल्यास त्यांच्या विरूध्द प्रशासकीय कारवाई केली जाईल अशा सर्व रुपाचे सकस निर्देश या वेळी गटविकास अधिकाऱ्यांनी दिले,
या बैठकीला इस्लापूर जलधरा जिल्हा परिषद गटातील शिवणी आप्पारापेठ परोटी नंदागाव कोसमेट तोटंबा भिसी वाळकी कोल्हारी पांगरी सावरगाव थारा सावरी डोंगरगाव भंडारवाडी रिठा गोडजेवली मार्लागुंडा तोटंबा (माना) कुपटी तल्हारी गोंडेमहागाव कंचली पागरपहाड चिखली मलकजाम दयाळ धानोरा या गावचे सर्वच ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक व ग्रामसेविका यांनी या बैठकीत उपस्थिती दर्शवली होती,
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी राठोड, विस्तार अधिकारी डी एल उडतेवार, आरोग्य विस्तार अधिकारी श्रीमनवार, विआरसी चे कांडलीकर, यांनी मार्गदर्शनात सहभाग नोंदवला होता, तालुकास्तरीय बैठक इस्लापूर सारख्या मध्यस्थी ग्रामीण भागात लागल्याने परिसरातील सरपंच व ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
Tuesday, 21 January 2020

Home
तालुका
गटविकास अधिकारी धनवे यांच्या अध्यक्षतेखाली इस्लापूर येथे ग्रामसेवकांची तालुकास्तरीय बैठक संपन्न…
गटविकास अधिकारी धनवे यांच्या अध्यक्षतेखाली इस्लापूर येथे ग्रामसेवकांची तालुकास्तरीय बैठक संपन्न…
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment