...अन् किन्नर रविनाच्या मर्दानगीच्या भीतीने पळाले दोन गुंड... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 13 January 2020

...अन् किन्नर रविनाच्या मर्दानगीच्या भीतीने पळाले दोन गुंड...


...अन् किन्नर रविनाच्या मर्दानगीच्या भीतीने पळाले दोन गुंड...

किनवट :जबरी चोरीच्या गुन्ह्यात पोलीसांना सहकार्य करुन गुन्हा उघडकीस आणन्यास पोलिसांना मदत केल्याबद्दल कीन्नर रविना पुजा बकस, मारोती उत्तम फोकटे यांचा काल(दि.१२) रात्री आठ वाजता  पोलिस ठाण्यात बोलावून उपविभागीय पोलिस अधिकारी  मंदार  नाईक यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.
          यावेळी पोलिस निरीक्षक मारोती थोरात,या गुन्ह्याचे तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार यांच्यासह पोलिस कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.
          मागच्या गुरुवारी (दि.९)रात्री ११ वाजेच्या सुमारास बाहेर गावच्या एका व्यक्तीला जिल्हा परिषद हायस्कूच्या प्रांगणात नेऊन दोन आरोपी त्याला जबर मारहाण करीत होते.यावेळी तो व्यक्ति "वाचवा..वाचवा "असे ओरडत होता.तेंव्हा रेल्वे स्टेशन च्या रस्त्याने जात असलेल्या रविनाने ते ऐकले व आपला मित्र मारोती फोकटे याला सोबत घेऊन शाळेच्या मैदानाकडे धाव घेतली.ते येत असल्याचे पाहून आरोपींनी त्या व्यक्तीकडून २ हजार ७०० रुपये व मोबाईल हिसकावून घेऊन पोबारा केला होता.
         यावेळी कीन्नर रविना व मारोती फोकटे यांनी  त्या व्यक्तीस योग्य ते सहकार्य करुन याची माहिती पोलिसांना देउन सहकार्य केले होते.या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (दि.१०)गुन्हा दाखल करुन आरोपिंना अटक करुन न्यायालयात हजर केले होते. तेंव्हा   न्यायमुर्तीनी आरोपिंना सोमवारपर्यंत कोठडी सुनावली होती.

No comments:

Post a Comment

Pages