भारत ही बुद्धाची भूमी म्हणून जगात ओळख - ज्येष्ठ इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 13 January 2020

भारत ही बुद्धाची भूमी म्हणून जगात ओळख - ज्येष्ठ इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर


भारत ही बुद्धाची भूमी म्हणून जगात ओळख - ज्येष्ठ इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर 

लेखक प्रकाश जाधव यांच्या 'प्राचीन भारतातील बौद्ध स्थळांचा इतिहास' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात केले प्रतिपादन ,अनेक साहित्यिकांची उपस्थिती

चिपळूण : भारताला खूप मोठा प्राचीन इतिहास लाभलेला आहे तसेच प्राचीन संस्कृतीचा ही वारसा आहे. भारताच्या प्राचीन इतिहासआणि संस्कृतीचा अभ्यास केला असता आसेतुहिमाचल बौध्द संस्कृतीच्या पाऊलखुणाच सर्वत्र दिसतात. जिथे जाल तिथे बुद्धाचे अस्तित्व दिसते, बुद्ध ही भारताने जगाला दिलेली अमूल्य अशी देणगी आहे, त्यामुळेच भारत ही बुद्धाची भूमी म्हणून जगात ओळखली जाते, असे स्पष्ट प्रतिपादन जेष्ठ इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर यांनी येथे केले. 
           चिपळुणातील सुप्रसिद्ध लेखक व बौद्ध धम्माचे अभ्यासक प्रकाश तथा अप्पा जाधव यांच्या 'प्राचीन भारतातील बौद्ध स्थळांचा इतिहास: एक दृष्टिक्षेप' या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज चिपळूण येथील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुस्तकाचे प्रकाशक औरंगाबादच्या कौशल्य प्रकाशनचे प्रमुख डॉक्टर अशोक गायकवाड हे होते. यावेळी विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा अभ्यासक अण्णासाहेब शिरगावकर ,बौद्ध धम्माचे अभ्यासक प्रभाकर जाधव ,लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष तथा साहित्यिक प्रकाश देशपांडे ,ज्येष्ठ कवी अरूण इंगवले, प्रवचनकार धनंजय चितळे ,कवी राष्ट्रपाल सावंत ,पत्रकार संदेश पवार, नगरसेवक तथा सभापती उमेश सपकाळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष रमेश चिपळूणकर ,सामाजिक कार्यकर्ते रमाकांत सपकाळ, माजी सभापती उज्वलाताई जाधव ,सामाजिक कार्यकर्ते राजू भाई जाधव ,गौतम जाधव, तानु आंबेकर , अनंत हळद , लेखक प्रकाश जाधव, पत्नी प्रतिक्षा जाधव आदी उपस्थित होते . यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक अण्णासाहेब शिरगावकर यांच्या हस्ते लेखक आप्पा जाधव यांच्या 'प्राचीन भारतातील बौद्ध स्थळांचा इतिहास एक दृष्टिक्षेप 'या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
        ते पुढे म्हणाले की, भारतातील बौद्ध संस्कृतीचा इतिहास फार जुना आहे. महाराष्ट्रातील मूळचे रहिवाशी लोक हे महार समाजाचे होते,  तसेच नाग वंशाचे होते, त्यावरूनच महारठ्ठ,  महाराष्ट्र हा शब्द वापरला जात आहे, असे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे, ते खरे आहे, असे सांगितले.
        यावेळी या पुस्तकाचा परिचय करून देताना प्रा. गिरीराज पांडे,  धनंजय चितळे , प्रभाकर जाधव यांनी पुस्तकातील विषयाचे महत्व अधोरेखित करून एक लेखक म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका किती महत्त्वाची आहे, हे विशद केले .तसेच प्रस्तुत पुस्तकात बौद्ध स्थळांचा घेतलेला आढावा आणि त्या अनुषंगाने बौद्ध धम्माचे केलेले विवेचन सर्व समाजातील घटकांना लक्षात घेऊन केलेले असल्याने हे पुस्तक समाजाला जोडणारा एक दुवा ठरणार आहे, असे सांगितले.
           अध्यक्षीय भाषणात डॉक्टर अशोक गायकवाड यांनी लेखक प्रकाश जाधव यांच्या या पुस्तकाचे कौतुक करताना इतिहास विषयावरील हे पुस्तक असल्याने बौद्ध इतिहासाला एक नवा उजाळा मिळेल, असे सांगूनब्रिटिश इतिहास संशोधकांनी भारतातील बौद्ध संस्कृतीचा आणि संपन्न वारशाचा शोध घेऊन येथील बौद्ध धम्माला पुनरुज्जीवित केले . त्यांच्या पूर्वी भारतातून बौद्ध धम्म जवळपास लुप्त झालेला होता. मात्र ब्रिटिश इतिहास संशोधकांमुळे बुद्ध धम्माल गती मिळाली आणि म्हणूनच हा संपन्न वारसा आज आपण पाहू शकतो आणि त्याचा अनुभव घेऊ शकत आहोत . त्यामुळेच अप्पा जाधव यांचे पुस्तक सर्वसामान्य वाचकाला नवी दृष्टी देऊ शकेल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश पवार यांनी तर आभार प्रदर्शन रमाकांत सपकाळ यांनी केले . या कार्यक्रमाला चिपळुणातील अभय चितळे,  समृद्धी कदम, डॉक्टर अशोक सपकाळ , उल्हास कदम, मंडपे रावसाहेब, माधवराव पवार  ,समाज भूषण भाऊ गायकवाड ,भूषण शिंदे, यांच्यासह बहुसंख्य सुजाण वाचक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages