लोणी शाळेत मित्र उपक्रमांतर्गत आनापान वर्गास प्रारंभ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 13 January 2020

लोणी शाळेत मित्र उपक्रमांतर्गत आनापान वर्गास प्रारंभलोणी शाळेत मित्र उपक्रमांतर्गत आनापान वर्गास प्रारंभ


किनवट :
        मित्र उपक्रम हा महाराष्ट्र शासन व विपश्यना संशोधन संस्था आणि सर्व विपश्यना ध्यानकेंद्र ह्यांचा एक संयुक्त कार्यक्रम असल्याने जिल्हा परिषद लोणी प्राथमिक शाळेत मित्र उपक्रमास सुरवात करण्यात आली असून रोज सकाळी परिपाठानंतर दहा मिनिटे याचा सराव घेण्यात येत आहे.

          आनापानच्या नियमित सरावाव्दारे सुयोग्य रितीने मनाची जागृकता आणि एकाग्रता वाढवून त्याच्या आधारे बाल- युवा वयातच विद्यार्थ्यांचा सर्वांगिन मानसिक, बौद्धीक, गुणवत्ता आणि व्यक्ती विकास घडवून आणने हा मित्र उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.  किनवट तालुक्यात नववर्षारंभी सुरु केलेला हा उपक्रम पहिलाच असल्याचे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांनी सांगितले.

          आनापानसति किंवा आनापनाचा अभ्यास म्हणजे आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावर कोणतीही कल्पना वा मूल्यमापन न करता त्याला नियंत्रित वा संतुलित न करता तटस्थपणे केवळ निरीक्षण करित मन केंद्रित ठेवण्याचा सराव. आनापान हा शब्द आन म्हणजे आत येणारा आणि अपान म्हणजे बाहेर जाणारा श्वास, ह्या दोन शब्दांतून तयार झाला आहे. हा सराव कोणत्याही वेळी, कोणत्याही जागी करता येते. असे मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी ह्यांनी सांगितले.

          या उपक्रमातून विद्यार्थ्यांत सतर्कता आणि एकाग्रतेत वाढ होते, मनाचा चंचलपणा बैचेनी आळस कमी होते, चिंता काळजी ताणतणाव कमी होते, स्मरणशक्ती आणि ग्रहणशीलतेत वृध्दी होते, भय न्यूनगंड साशंकता आत्मसंदेह कमी होते, स्वंयशासन आत्मविश्वास निर्णयक्षमतेत वाढ होते, नैराश्य कंटाळा उदासिनतेत घट होते, सृजनशीलता आणि कार्यक्षमता वाढते, क्रोध चिडचिड व्देष दुर्भावना कमी होते, सर्वांबदल आत्मियता आणि स्नेहभाव वाढतो. ह्या सर्वांचा सकारात्मक प्रभाव विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आणि गुणवत्तेत दिसू शकतो असे उपक्रमशील शिशिका शाहिन बेग आणि विद्या श्रीमेवार यांचे म्हणने आहे.

No comments:

Post a Comment

Pages