तंत्रस्नेही बालकांतूनच उद्याचा शास्त्रज्ञ घडेल
- गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन
किनवट : कौशल्यपूर्ण अविष्कारातून लोकोपयोगी नवप्रकल्प मांडणाऱ्या तंत्रस्नेही बालकातून उद्याचा शास्त्रज्ञ घडल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी केले.
शिक्षण विभागाच्यावतीने मंगळवारी ( ता. ३१ ) महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे आयोजित ४५ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी संस्थासचिव अभियंता प्रशांत ठमके, शिक्षण विस्तार अधिकारी ना.ना. पांचाळ, पत्रकार प्रदीप वाकोडीकर, किशन भोयर, फुलाजी गरड, साजीद बडगुजर, राम बुसमवार, उत्तम कानिंदे, प्राचार्य राजाराम वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालुक्यातील विविध शाळांमधून इयत्ता सहावी ते आठवीच्या पहिल्या गटात ४८ व इयत्ता नववी ते बारावीच्या दुसऱ्या गटात नऊ असे एकूण सत्तावन्न विज्ञान प्रकल्प सहभागी झाले होते. प्रा. उमाकांत इंगोले, प्रा.रघुनाथ इंगळे व प्रा. संजय ढाले यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
जिल्हास्तरीय सहभागासाठी तालुक्यातून निवडलेले प्रकल्प : गट पहिला : प्रथम - पोर्टेबल इन्व्हर्टर ( सूयश प्रशांत ठमके,एम.के.टी. इंग्लिश स्कूल, कोठारी चि. ), द्वितीय -दळणवळण ( म. रिहान अ. रहीम चव्हाण, जवाहेरूल उलूम उर्दू हायस्कूल, किनवट ), तृतीय -सोलार कुकर ( सोपान सुदर्शन कऱ्हाळे, मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मेडियम स्कूल, कोठारी चि. )
दुसरा गट : प्रथम -मल्टीपर्पज ड्रोन ( कौस्तुभ नंदकिशोर सराफ, सेंट मेरी'स इंग्लिश स्कूल, गोकुंदा ), द्वितीय -वाटर मॅनेजमेंट ( ओम रुपसिंग जाधव, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा ), तृतीय -घरगुती प्रोजेक्टर ( रोहित किशोर भरणे, श्री बाबासाहेब मुखरे विद्यालय, किनवट )
विज्ञान शिक्षक तथा पर्यवेक्षक महेंद्र नरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. शेख हैदर यांनी आभार मानले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक जुम्माखान पठाण, उपप्राचार्य सुभाष राऊत, पर्यवेक्षक किशोर डांगे, संतोष बैसठाकूर, विशान शिक्षक अंबादास जुनगरे, प्रज्ञा पाटील, गंगाराम श्रीमंगल, सुरेंद्र पाटील, प्रमोद मुनेश्वर, विकास गवळे, सुरेश किनवटकर, मनोज भोयर, प्रशांत डवरे, रमाकांत गायकवाड, शाम बागनवार, सतीश विणकरे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment