महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही सीएए कायदा. - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 3 February 2020

महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही सीएए कायदा. - मुख्यमंत्री उध्दव ठाकरेमहाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही सीएए कायदा. 
   - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला नागरिकत्व सिद्ध करणे हे केवळ मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाईल, त्यामुळे मी महाराष्ट्रात तो कायदा येऊ देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. आपल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. आज त्या मुलाखतीचा प्रोमो हा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रोमोमध्ये सीएए संदर्भात उत्तर देताना सीएए कायदा महाराष्ट्रात येऊ देणार नसल्याचे म्हटल्यामुळे केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सीएए वरून निर्माण होताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तीसरा प्रोमो आज प्रसिद्ध करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रोमोत सीएए संदर्भात उत्तर देताना महाराष्ट्रात सीएए कायदा येऊ देणार नसल्याचे उत्तर दिले आहे. सीएए संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे, यासंदर्भात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावी, अशी अनेकांची मागणी होती.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असून राष्ट्रवादी व काँग्रेसने सीएए विरोधात भूमिका घेतली असताना त्यांच्यासोबत सत्ते असणारा शिवसेना हा पक्ष काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरेंनी अखेर एका मुलाखतीदरम्यान मौन सोडले आणि महाराष्ट्रात सीएए लागू होऊ देणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages