जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी यापुढेही शिक्षकांनी अथक प्रयत्न करावेत.. आ.माधव जवळगावकर
हिमायतनगर :
गुरूगौरव प्राप्त शिक्षक बांधवाना ज्या शाळेमुळे आपला गौरव झाला ती शाळा आणी आपले विद्यार्थी कसे घडतील याकडे लक्ष देऊन पुरस्कार रत्न शिक्षकांनी जि.प.प्रा.शाळेची गुणवत्ता वाढवून डिजीटल शाळा व आययसओ मानांकन मिळविण्यासाठी पुढाकार घेऊन पुरस्काराचा सन्मान ठेवावा असे आवाहन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.
हिमायतनगर तालुक्यातील शिक्षकांचा गौरव पुरस्कार गेल्या तिन वर्षापासुन रखडला होता.त्या तालुकास्तरीय गुरूगौरव पुरस्कार सोहळ्याचे उदघाटन दि.1 फेब्रुवारी रोजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षा पं.स.च्या सभापती सौ.रेखाताई आडे,प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी सुहाह कोरेगावे,गटशिक्षाधिकारी रमेश संगपवाड,माजी जि.प.सदस्य सुभाष राठोड ,दिलीप बास्टेवाड, विकास पाटील,गणेशराव शिंदे,डाॅ.प्रकाश वानखेडे,अ.आखील,रफिक भाई,माजी सभापती जोगेंद्र नरवाडे, मायाताई राठोड,आडेलाबाई हातमोडे,उपसभापती शशिकलाबाई कौठेकर,बालाजी राठोड,धाञक,डांगे हे होते.
तालुक्यातील एकुण 85 आदर्श शिक्षक-शिक्षीकांचा गुरूगौरव पुरस्कार देऊन आ.जवळगावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.याबरोबरच गटशिक्षणाधिकारी रमेश संगपवाड यांचा सपत्निक सेवानिवृत्तीबद्दल जवळगावकर यांनी सत्कार केला.यावेळी बोलतांना आ.जवळगावकर म्हणाले कि तालुक्याती जि.प.प्रा.शाळेला कुठलिही कमतरता पडणार नाही या शाळेब्द्दल शिक्षकांना काही अडचणी आल्यास त्या माझ्यापर्यंत पोहचवाव्यात त्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटीबद्द असुन गुरूगौरव पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक बांधवांनी पुढील काळात देखील शाळेची गुणवत्ता वाढले याकडे लक्ष देत आपल्या तालुक्याचे नाव उज्वल व्हावे यासाठी शैक्षणिक क्षेञात धडपड करावी यापुढील गुरूगौव पुरस्कार हा वर्षानुर्षे रखडणार नसुन तो वर्षातच दिला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
या पुरस्कार सोहळ्यास शिक्षण क्षेञातील मंडळी सहकुटुबांसह उपस्थीत झाले होते.या कार्यक्रमाचे सुञसंचालन शिक्षक नाथा गंगुलवार यांनी केले तर आभार शिक्षण विभागाचे अरूण पाटील यांनी मानले.या सोहळ्यासाठी तालुक्यातील शिक्षक,मुख्याध्यापक,केद्रंप्रमुखानी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment