संत गाडगेबाबा ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिकेची लवकरच सुरुवात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 15 February 2020

संत गाडगेबाबा ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिकेची लवकरच सुरुवात

संत गाडगेबाबा ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिकेची लवकरच सुरुवात

किनवट : सुभाषनगर  येथे लवकरच संत गाडगेबाबा ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिकेची सुरुवात करण्यात येणार आहे. या अभ्यासिकेचा लाभ घेण्यासाठी परिसरातील व शहरातील इच्छुक विद्यार्थ्यांनी उध्वराव रामतिर्थकर (मोबाईल नंबर:९८२२१००८२६) व प्रा.रामप्रसाद तौर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रबोधिनी तर्फे करण्यात आले आहे.
   सुभाषनगर,किनवट येथे संत गाडगेबाबा ज्ञान प्रबोधिनीचे अभ्यासवर्ग व अभ्यासिका सुरु होत आहे. प्रबोधिनीची ध्येय - धोरणे ही सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षा सोबतच परिसरातील वाचकांना उत्तम दर्जाचे वाचनालय उपलब्ध करुन देणे हे आहे.संस्थेच्या उद्दीष्टांमध्ये विविध प्रकारच्या ग्रंथ संग्रहा बरोबरच वर्तमान पत्रे,नियत कालिके, उपलब्ध करुन देणे, दृकश्राव्य माध्यमातून प्रबोधन करणे, अनेक महत्वाच्या विषयांवरील नामांकित वक्त्यांची भाषणे,व्याख्यानमालांचे आयोजन करणे,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणे इत्यादी बाबी प्रामुख्याने असतील.
    या भागातील सर्व सामान्य,होतककरु व अभ्यासू  विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षांना उपयुक्त ठरेल असे प्रशिक्षण व समृध्द ग्रंथालयास २४ तास वाचन कक्ष उपलब्ध करुन देण्याचा प्रबोधिनीचा उद्देश आहे.यात एम.पी.एस.सी.,युवा.पी.एस.सी., बॅंकिंग,टी.ई.टी., आरोग्य सेवा, तलाठी,ग्रामसेवक, पोलिस खाते,ग‌हरक्षक दल, जिल्हा परिषद भरती अशा सर्वच स्पर्धा परीक्षा भरती संबंधी विद्यार्थ्यांचि तयारी करुन घेणे व त्यासाठी आवश्यक असणा-या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

No comments:

Post a Comment

Pages