किनवट शहरात व परिसरात छत्रपती शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 21 February 2020

किनवट शहरात व परिसरात छत्रपती शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा

किनवट शहरात व परिसरात छत्रपती
शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा


किनवट :  मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराजा करितो तुज मानाचा मुजरा..! या ओतप्रोत भावनेने यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत अशा जाणत्या राजाची अर्थात अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराजांचा 390 वा जन्मोत्सव आज  बुधवारी (ता.19) शहरासह तालुक्यात अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. शिवप्रेमींच्या उत्साहाला आनंदाचे उधान आले होते.

     सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त ! अशा भारावलेल्या मन:स्थितीत शिवप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहात होता. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती तर्फे किनवट येथे आपल्या लाडक्या शिवरायाची जयंती साजरी करण्यात आली. शिवप्रेमींनी सर्वत्र ध्वज,पताकांनी सजविल्याने शहर भगवे झाल्याचे भासत होते. सकाळी 11 वाजता शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी चौकात शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तत्पूर्वी एस.व्ही.एम.कॉलनीतून संभाजी ब्रिगेडच्या शिवप्रेमींनी  शिवरायांच्या भव्य तैलचित्रांसह  मोटारसायकलींची भव्य बाईक रॅली काढली. ती रॅली गोकुंदा येथील ठाकरे चौकापर्यंत जाऊन परत किनवट शहरातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ येऊन थांबली. जय भवानी, जय शिवरायांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला. छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळयाच्या पुष्पपूजनानंतर सर्वांनी नम्रतेने अभिवादन केले. आ.भीमराव केराम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान जिजाऊ ब्रिगेड तर्फे  भारतीय पोषाखातील महिलांची शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. जयंती उत्सव समिती तर्फे न.प.च्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.  यावेळी नगराध्यक्ष आनंद मछेवार, बाजार समितीचे सभापती अनिल पाटील कराळे,  भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, उपनगराध्यक्ष अजय   चाडावार, मनसेचे तालुकाध्यक्ष नितीन मोहरे, शहरअध्यक्ष सुनील ईरावार, डॉ. प्रसाद सुर्वे,  संभाजी ब्रिगेडचे बालाजी शिरसाट, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, अशोक नेमानीवार, आशिष कराळे पाटील,  विनायक गव्हाणे,  संजय पाटील कदम,  मारुती भरकड,   संतोष डांगे,  मारोती  दिवसे पाटील,  अमरदीप कदम, बाळकृष्ण कदम,  अनिल पाटील सूर्यवंशी, के. मूर्ती,  सुरेश पाटील सोळंके,  अभय महाजन,  राजू पाटील साळुंखे, उत्तम पाटील जाधव,  राजू सुरोशे, श्याम मगर,  कपिलअण्णा रेड्डी,  मारोती  शिरफुले,  गोविंद देवडे,  पत्रकार प्रदीप वाकोडीकर,  शकील बडगुजर,  आशिष देशपांडे, केशव डहाके,  जयवंत चव्हाण,   आनंद भालेराव,  विजय जोशी,  जगदीश सामनपेल्लीवार,  रवि कानींदे,  साजिद बडगुजर,    माधव सूर्यवंशी,  शिवाजी काळे,  मलिक चव्हाण,  दत्ता जायभाये, अँड. सूर्यवंशी,  संतोष अनंतवार व इम्रान खान यांचेसह  प्रतिष्ठित नागरीक व शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

           सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची जिजामाता चौकातून नाशिकच्या बॅन्ड पथकासह भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. कायक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन कदम, उपाध्यक्ष प्रदीप कोल्हे, रितेश मंत्री, सचिव सुमित माने, कोषाध्यक्ष आकाश इंगोले,  सहसचिव नागेश कदम,  सहकोषाध्यक्ष विराज शिंदे, कार्यकारणी सदस्य गजानन कदम,  पवन रावते,  शुभम हसबे,  अश्विन पवार,  महेश चव्हाण,  श्रीकांत मैन्द,  अमोल जाधव,  पाटील शिंदे, गणेश आमले,  विशाल शिंदे,  स्वप्निल कोटपेट,  राम वानखेडे,  जाधव श्रीकांत,  बेंद्रे, विक्रम पवार,  विलास कानडे,  दत्ता शिंदे, अवधूत कदम आदींनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages