अडकलेल्या 4O परप्रांतीय मजूरांना येथे असेपर्यंत प्रदीप चाडावार देणार जेवन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 29 March 2020

अडकलेल्या 4O परप्रांतीय मजूरांना येथे असेपर्यंत प्रदीप चाडावार देणार जेवन


किनवट: लॉकडाऊनमुळे येथे अडकलेल्या परप्रांतीय मजूरांच्या जेवनाची जबाबदारी येथील मूळ रहिवाशी तथा सध्या नांदेडमध्ये वास्तव्य करणारे उद्योजक प्रदीप चाडावार यांनी उचलली असल्याचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी सांगितले.
       कोरोना (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजन कामाच्या ठिकाणी अडकून पडले आहेत. अशाच प्रकारे तेलंगणातून एका ट्रकने अवैध वाहतूक करणाऱ्या गुजरात व राजस्थानमधील 38 मजूरांना किनवट पोलिसांनी किनवट तालुक्यातील महाराष्ट्र -तेलंगाणा सीमा असलेल्या घनपूर नाका येथे ताब्यात घेतले. पोलिस निरिक्षक मारोती थोरात यांनी त्यांना तहसील कार्यालयात आणले. तिथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बोमकुंटीवार, डॉ.झडते,, डॉ. दत्ता नरवाडे, डॉ.गजानन काळे यांनी त्यांची तपासणी केली. स्वामी साहेबराव पवार यांनी सर्वांना जेवण दिले.
              सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी चालक,क्लिनरसह त्या चाळीस जनांना छत्रपती शिवाजी नगर परिषद मंगल कार्यालयात नेले. तिथे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी निवासी सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी दोन दिवसाच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.
              अडकून पडलेला कुणीही मजूर, प्रवाशी उपाशी राहू नये यासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत येथील मूळ रहिवाशी तथा सध्या नांदेडमध्ये वास्तव्य करणारे उद्योजक प्रदीप चाडावार यांनी हे परप्रांतीय मजूर जेवढे दिवस राहतील तोपर्यंत एकवेळ चहा, दोन वेळा जेवन व प्रत्येकास हँडवॉश देण्याची जबाबदारी उचलली आहे. अशाच प्रकारे दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांनी पुढं येऊन हातावर पोट असणारे व निराधार यांच्या पर्यंत अन्न,धान्य पोहचवावे, असे आवाहन तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages