१५ एप्रिल पर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे ; मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 29 March 2020

१५ एप्रिल पर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे ; मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांचे आवाहन


किनवट : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पाश्र्वभूमीवर येथल्या १५ एप्रिल पर्यंत कोणत्याही कारणासाठी (अत्यावश्यक सेवा सोडून ) आपण घराबाहेर येऊ नये,असे आवाहन साने गुरुजी रुग्णालयाचे संचालक व मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य तथा आरोग्य समितीचे अध्यक्ष डाॅ.अशोक बेलखोडे यांनी आज (दि.२९) केले आहे.
         आपले म्हणणे  गांभीर्याने घ्यावे,असे सांगून डाॅ.बेलखोडे म्हणाले की, आपल्या देशातील करोना टास्क फोर्सचेही हेच आवाहन आहे. जर, जनतेने प्रतिसाद दिला नाही तर मे अखेर किमान ३०००० मृत्यू होऊ शकतात . विशेष करून बाहेर गावाहून आलेल्या  येथील भुमिपुत्रांनी स्वत;ची व समाजाची विशेष  काळजी घ्यावी, माझ्या या आवाहनाल होकारात्मक प्रतिसाद द्यावा, अपेक्षाही  डॉ. अशोक बेलखोडे यांनी व्यक्त केली आहे.
   किनवट परिसरातील आपणां सर्वांना आरोग्य संपन्न आयुष्य लाभावे यासाठी मी प्रार्थना करतो,असे सांगून डाॅ.बेलखोडे म्हणाले की, परिस्थती रोजच्या रोज बिकट होत चाललीय . आज या क्षणाला जगात करोनाच्या रुग्णाची संख्या सहा लाखावर पोहोचलीय . भारतात नऊशे . आपला देश तिसऱ्या टप्प्यात जातोय . जर, आपण अजूनही काळजी घेतली नाही तर भीषण परिस्थिती येऊ शकते . करोनामय वातावरण बदलून करुणामय झाले पाहिजे, एकमेकांविषयी प्रेमाने वागले पाहिजे,  समाजामध्ये  जिव्हाळा वाढला पाहिजे, द्वेष , मत्सर , राग ,संताप , असूया या सर्व षडरीपुना तिलांजली दिली पाहिजे,आपले सर्वांबरोबारचे संबध हवेहवेसे वाटणारे असले पाहिजेत,असे वातावरण निर्माण व्हावे,अशी सदिच्छाही डाॅ.बेलखोडे यांनी शेवटी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Pages