आपत्कालीन रुग्णालय उभारण्यास आंबेडकरवादी मिशनचे वसतिगृह शासनास उपलब्ध करुन देणार - दीपक कदम
नांदेड : कोरोना (covid १९) रोगाचा वाढता प्रभाव पाहता भविष्यात शासनास गरज पडल्यास आयसोलेशन ( isolation) वार्ड किंव्हा आपत्कालीन रुग्णालय उभारायचे असल्यास आंबेडकर मिशनचे वसतिगृह उपलब्ध करुन देण्याची तयारी आंबेडकरवादी मिशन चे प्रमुख दीपक कदम यांनी दाखविली आहे.
मिशन वसतिगृहातील ५३ रूम ,७० टॉयलेट बाथरूम ,४ हॉल सह सर्व यंत्रणा शासनास आपत्कालीन परिस्थितीत वापरून १५० बेडचे हॉस्पिटल उभारता येईल .राष्ट्रीय संकटाच्या स्थितीत मिशन चे वसतिगृह शासनास गरजेनुसार उपलब्ध करून देण्याची तयारी दीपक कदम यांनी दाखविली आहे.
Very nice
ReplyDelete