आज घरोघरी आरोग्याची आणि सुरक्षिततेची गुढी उभारा - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई : बुधवारी हिंदु नव वर्षाचा प्रारंभ होत असून या दिवशी घरोघरी आरोग्याची आणि सुरक्षिततेची गुढी उभारली जावी. संयम, स्वंयशिस्त आणि सहकार्यातून संकटावर मात करण्याची जिद्द मनात बाळगावी. यातून हे संकट हद्दपार करण्याचा संकल्प या नवीन वर्षाच्या निमित्ताने करावा, असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेतले तर दुष्टप्रवृत्तीचा नाश करून मिळवलेल्या विजयाचा हा दिवस असल्याचे दिसते. यश आणि विजयाचे प्रतीक असलेली ही गुढी त्यामुळेच ऊंच उभारली जाते. हे संकल्पाच्या सिद्धीचेही प्रतीक आहे. यातून प्रेरणा घेऊन आपण ही कोरोनारुपी संकटावर मात करू. गर्दी न करता घरगुतीस्वरूपात हा उत्सव साजरा करू. आपण सर्वजण सहकार्य करत आहातच. यापुढेही सरकारच्या उपाययोजनांना कृतीशील साथ द्यावी अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
Tuesday, 24 March 2020
आज घरोघरी आरोग्याची आणि सुरक्षिततेची गुढी उभारा - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
Tags
# महाराष्ट्र
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment