तीन एप्रिल रोजी तालुका प्रशासनाच्या वतीने किनवटमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन
किनवट : कोरोना विषाणू (कोव्हिड - १९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हातभार लावण्याच्या उद्देशाने सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुका प्रशासनाच्या वतीने तीन एप्रिल रोजी रक्तदान शिबीर आजोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी केले आहे.
कोरोना विषाणू (कोव्हिड - १९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून कमी रक्त साठ्याची पोकळी भरण्यास हातभार लावण्याच्या हेतूने तालुका प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी ( दि. 3 एप्रिल ) सकाळी अकरा वाजता रक्तदान शिबीर आजोजित करण्यात आले आहे . रक्तदान , जीवनदान आहे . आपले रक्त दुसन्याचे जीवन वाचवू शकते . रक्तदान ही जन सामान्यांची सेवा , माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दानधर्म म्हणजेच रक्तदान आहे . तरी आपणास याव्दारे रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वकील, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक, विविध कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक आदिंसह सर्वांनी या शिबीरात सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त रक्तसाठा आपल्या तालुक्याच्या वतीने उपलब्ध करून द्यावा,असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी केले आहे.
मराठवाडा वैधानिक विकास मंडळ सदस्य व आरोग्य समिती अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांनी आपले साने गुरुजी रुग्णालय सर्व स्टॉपसह शिबीर घेण्यासाठी स्थळ म्हणून उपलब्ध करून दिले आहे.
ईच्छूक दात्यांनी नायब तहसीलदार महंमद रफीक महमद ब. (9850840041 ), प्रा. डॉ. सुनील व्यवहारे (9822618580 ), प्रा. डॉ. पंजाब शेरे (7378998849 , 9767623069 ), गणेश बिंगेवार (7350522544 ) व विकास बोलेनवार (7770045636 ) यांचेशी संपर्क साधून नोंदणी करावी. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकरिता एकाच वेळी रक्तदानासाठी गर्दी न करता संपर्ककर्त्यांकडून मिळालेल्या वेळेवर आपण शिबीर स्थळी येऊन रक्तदान करावे,असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
Tuesday, 31 March 2020

तीन एप्रिल रोजी तालुका प्रशासनाच्या वतीने किनवटमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment