नांदेड : पोलीस प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी तसेच जिल्हा सीमा भागावर निरीक्षण करण्यासाठी आजपासून ड्रोन कॅमेराने निरीक्षण करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाला या ड्रोन कॅमेऱ्याचे फोटो आणि शूटिंग याचा उपयोग कोरोनाच्या प्रतिबंधक उपायांमध्ये प्रभावी ठरणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून टवाळखोर बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
ज्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली आहे अशा ठिकाणी पोलिसांची पेट्रोलिंग वाढवून फिरणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment