संविधान निवासस्थानी दि.14 एप्रिल पर्यंत दररोज गरजूंना भोजनदान सुरू राहणार - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 31 March 2020

संविधान निवासस्थानी दि.14 एप्रिल पर्यंत दररोज गरजूंना भोजनदान सुरू राहणार - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेकोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

 संविधान निवासस्थानी दि.14 एप्रिल  पर्यंत दररोज गरजूंना भोजनदान  सुरू राहणार  - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 31  - कोरोना सारख्या संकट समयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षासह सर्व पक्षांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी  सर्वपक्षीय बैठक घ्यायला पाहिजे होती. कोरोनाशी लढा देण्यासाठी विरोधी पक्ष सरकार सोबत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात सर्व पक्षीय बैठक आयोजित केली पाहिजे अशी सूचना रिपब्लिकन  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे.  
आज बांद्रा येथील  संविधान निवासस्थानी लोकडाऊन मुळे अडकलेल्या मजुरांना; हातावर पोट असणाऱ्या गरजूंना मोफत भोजनदान ना रामदास आठवले यांच्याहस्ते देण्यात आले. आज पासून सुरू झालेले हे भोजनदान लोकडाऊनच्या काळात दि. 14 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. आज किमान 200 गरजुंना मोफत भोजनदान देण्यात आले. यावेळी रिपाइं महिला आघाडीच्या नेत्या सौ सीमाताई आठवले; कुमार जित आठवले; तसेच हेमंत सावंत; अमित तांबे आदी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्स ठेऊन गरजूंना भोजनदान देण्यात आले.
केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोना विरुद्ध चे युद्ध जिंकण्यासाठी पीएम केयर फंडात आपल्या खासदार निधीतून 1 कोटी आणि आपले दोन महिन्याच्या  वेतनाचे 4 लाख रुपये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फंडात देण्याचे जाहीर केले आहे.
लोकडाऊनच्या काळात ना रामदास आठवले आपल्या संविधान निवासस्थानी तळ ठोकून असून रोज कॅरम ; पूल टेबल असे  विविध खेळ आपल्या मुलासोबत कुमार जित सोबत खेळत आहेत. ग्रंथ वाचन करीत आहेत. सोशल मीडिया मध्ये फेसबुक लाईव्ह संवाद साधत आहेत. अनरक अडचणीत अडकलेल्यांचे  फोन रिसिव्ह करून अडचणी सोडावीत आहेत. सोशल मीडियातील ट्विटर आणि फेसबुक द्वारे माध्यमांशी संपर्क साधता आहेत. आलेल्या बातम्यांवर लक्ष देत आहेत. रोज कोरोना विरुद्ध जनजागृती करणाऱ्या कविता रचत आहेत. घरी राहा आणि कोरोनाला हरवा हा संदेश ना रामदास आठवले देत आहेत.  गोव्यात अडकलेल्या हजारो मजुरांच्या अडचणी तेथील रिपाइं कार्यकर्ते बाळू बनसोडे यांनी फोन करून केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांना काळविल्यानंतर ना आठवलेंनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शी संपर्क साधून तेथे अडकलेल्या हजारो मजुरांच्या अडचणी सोडविण्याची सूचना केली. त्यानुसार गोवा सरकार तर्फे या मजुरांच्या भोजनासह सर्व व्यवस्था करणार असल्याचे आश्वासन गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी ना रामदास आठवले यांना दिले .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी चांगले काम करीत आहेत. मात्र राज्यावर एखादे मोठे संकट आले तर राज्यातील विरोधी पक्ष आणि सर्व पक्षाच्या नेत्यांचा सल्ला घेण्याची सर्व पक्षीय बैठक आयोजित करण्याची परंपरा आहे. त्यानुसार कोरोनाच्या महासंकटाचा  एकजुटीने मुकाबला करण्यासाठी  आम्ही सरकार सोबत आहोत. विरोधी पक्षनेते  म्हणून देवेंद्र फडणवीस;भाजप चे राज्य अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील ; आणि माझा रिपब्लिकन पक्ष  आम्ही सर्व एकजुटीने कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकार सोबत आहोत . त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक  लवकर आयोजित करावी अशी सूचना ना रामदास आठवले यांनी केली आहे.

               

No comments:

Post a Comment

Pages