मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला ‘कोरोना’बाबत सविस्तर आढावा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 16 March 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला ‘कोरोना’बाबत सविस्तर आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला ‘कोरोना’बाबत सविस्तर आढावा
औरंगाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी प्रशासनाने घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे राज्यस्तररीय आढावा घेतला.
विभागीय आयुक्तांच्या दालनात व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, शासकीय व वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून कोरोनाबाबत अधिकाधिक जनजागृती करावी. परदेशातून आलेल्या नागरिकांबाबत खबरदारी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खासगी टूर कंपन्यांनीही पुढाकार घ्यावा. जनता शासनास सहकार्य करण्यास तयार आहे, परंतु जनतेत भिती निर्माण होणार नाही, याची देखील प्रशासकीय अधिकारी यांनी काळजी घ्यावी. प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी टाळावी. बस, रेल्वे आदी सार्वजनिक ठिकाणांवर खबरदारीच्या उपाययोजनांची प्रसिद्धी करण्यात यावी. माध्यमे, लोक प्रतिनिधींनी देखील यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना केल्या.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या समवेत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आदींसह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती. मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना यावेळी योग्य त्या सूचनाही केल्या.
औरंगाबादेतील कोरोना बाधित रुग्णावर सुरू असलेले उपचार आणि विभागात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी करण्यात येत असलेल्या सर्व उपाययोजनांबाबत श्री. केंद्रेकर यांनी श्री. ठाकरे यांना सविस्तर माहिती दिली.
                                    ******

No comments:

Post a Comment

Pages