खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने किनवट तालुक्यातील ६१६ शेतकऱ्यांना ६० लाखाचे अनुदान मंजूर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 16 March 2020

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने किनवट तालुक्यातील ६१६ शेतकऱ्यांना ६० लाखाचे अनुदान मंजूर

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने किनवट तालुक्यातील ६१६  शेतकऱ्यांना ६० लाखाचे अनुदान मंजूर

हिंगोली : किनवट आणि माहूर तालुक्यातील ६१६ शेतकऱ्यांचे  सन २०१७-१८ या काळातील शासन दरबारी  प्रलंबित असलेले तूर आणि हरभरा या रब्बी पिकांचे ६०लक्ष ४६ हजार रुपयाचे अनुदान खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाले आहे .
                           येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात नाफेडकडून तूर आणि हरभरा खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्यावतीने ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती, माल विक्री केल्यानंतर  केवळ आधार लिंक केलेल्या  शेतकऱ्यांना नाफेडच्या वतीने अनुदान मिळाले होते, तर आधार लिंक अभावी तूर उत्पादक ३२९ आणि हरभरा उत्पादक २८७ शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले होते . याबाबत हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील  यांनी राज्याचे कृषी व पणन मंत्री बाळासाहेब  पाटील यांना निवेदन देऊन थकीत अनुदान तात्काळ देण्याची मागणी केली ,खासदार हेमंत पाटील सैदव मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी खंबीर भूमिका घेऊन कार्य करतात ,पीकविमा बाबत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते, अनुदानाची रक्कम वाटपासाठी बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये याबाबत बँकांना सूचना केल्या होत्या,तर  नुकसान भरपाई मिळण्यासाठी सतत पाठपुरावा केल्याने भरपाई मंजूर करण्यात आली होती.  तर तूर व हरभरा अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा  केला .यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांचे २५ लक्ष ६७ हजार आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे ३४ लक्ष ७९ हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे . अनुदान मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीकडे प्राप्त झाली आहे .

No comments:

Post a Comment

Pages