पंचायत क्षेत्र विस्तार (पेसा) योजनेतून उचल केलेल्या निधीचा गोकुंदा हद्दीतील आदिवासी क्षेत्रात विनियोग करा -सुनील ईरावार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 16 March 2020

पंचायत क्षेत्र विस्तार (पेसा) योजनेतून उचल केलेल्या निधीचा गोकुंदा हद्दीतील आदिवासी क्षेत्रात विनियोग करा -सुनील ईरावार

पंचायत क्षेत्र विस्तार (पेसा) योजनेतून उचल केलेल्या निधीचा गोकुंदा हद्दीतील आदिवासी क्षेत्रात विनियोग करा -सुनील ईरावार
किनवट  : पंचायत क्षेत्र विस्तार (पेसा)योजनेतून उचल केलेल्या निधीचा गोकुंदा हद्दीतील आदिवासी क्षेत्रात विनियोग करण्याची मागणी पेसा कोष  समितीचे सदस्य सुनिल ईरावार यांनी  गोकुंदा ग्रामपंचायतीच्या  ग्रामविकास अधिकार्‍याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
 निवेदनात नमूद केले की गोकुंदा ग्रामपंचायतचा पेसा योजनेत समावेश असून या योजनेतून 2017 ते 2019 या दोन वर्षाच्या कार्यकाळात आरो प्लांट,  वाचनालय, ( पुस्तक खरेदी)आदिवासी आश्रम शाळा डिजिटल करणे, जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणे  तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गोकुंदा ग्रामपंचायतच्या  पेसा समितीने लाखो रुपयांचा निधी उचल केला आहे. गोकुंदा ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समाजाच्या विकासाचा प्रश्न असल्यामुळे पेसा  चा निधी उचल करण्यास समितीचा सदस्य म्हणून मी  ग्राम विकास अधिकाऱ्याला सहमती देऊन धनादेशावर स्वाक्षरी केली मात्र ग्राम विकास अधिकारी तसेच समितीच्या अध्यक्षांनी निधी उचल केल्यानंतर या निधीचा विनियोग न करता विकासात्मक कामे प्रलंबित ठेवली. उचल केलेल्या निधीचा समितीच्या अध्यक्षाने व ग्रामविकास अधिकाऱ्याने दुरुपयोग केला असण्याची शंका व्यक्त करत तीन वर्ष लोटले तरी ज्या कामासाठी निधी उचल केला त्या कामावर निधीचा उपयोग होत नसल्याबाबत कोष समिती सदस्य म्हणून मी  ग्रामविकास अधिकाऱ्यांना वेळोवेळी तोंडी व लेखी कळवले मात्र काहीही फायदा झाला नाही.त्यामुळे पेसा योजनेतील निधीत  गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईरावार यांनी केला आहे. दिनांक 25/8/2015 ते दिनांक 11/07/2019 या कालावधीत समितीच्या बँक खात्यातून एकूण 23 लाख 26 हजार 551 रुपयाचा व्यवहार झाला मात्र या व्यवहाराबाबत मला काहीही कळविण्यात आले नसल्याचे सुनिल ईरावार यांचे म्हणणे  आहे. त्यामुळे पेसा निधीच्या  गैरव्यवहारात कोष  समिती सदस्य म्हणून आरोप केल्या जाऊ नये या उद्देशाने  ग्राम विकास अधिकाऱ्याला लेखी पत्र देऊन पेसा योजनेतून उचल केलेल्या  निधीचा वेळेत योग्य विनियोग करून खर्चाचा अहवाल शासनाला सादर करावा असे कळविले असून तसे  न केल्यास  पोलिस ठाण्यात कायदेशीर तक्रार देणार असल्याचा ईशारा  सुनिल ईरावार  यांनी निवेदनातून दिला आहे.  याप्रकरणी आता वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात याकडे गोकुंदावासीयांचे  लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Pages