अनुसूचित जाती संदर्भातील बजेट लॅप्स होऊनये याबाबत कायदा करा- महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमची मख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 16 March 2020

अनुसूचित जाती संदर्भातील बजेट लॅप्स होऊनये याबाबत कायदा करा- महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमची मख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी

अनुसूचित जाती संदर्भातील बजेट लॅप्स होऊनये याबाबत कायदा करा- महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमची  मख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी
 मुंबई : सह्याद्री  अतिथीगृहात महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या पदाधिकाऱ्यांसमवेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ,राष्ट्रवादीचे प्रमुख खासदार शरद पवार ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे , गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड , जलसंपदा मंत्री  जयंत पाटील ,खासदार सुनील तटकरे व राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे , मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव व इतर सचिव, अप्पर मुख्य सचिव यांच्या समवेत  विविध प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली.

   यावेळी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष  इ. झेड. खोब्रागडे यांनी सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने शेड्युल कास्ट संदर्भातील बजेट लैप्स होणारा निधी याबाबत कायदा करावा, विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती द्यावी, मागासवर्गीय अधिकार्‍यांचे पदोन्नतीतील प्रमोशन लवकर द्यावे, त्याचबरोबर मागासवर्गीय अधिकाऱ्यांना मोक्याच्या पदावर नियुकत्या द्याव्यात, दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेसाठी  रक्कम वाढवून द्यावी, रमाई घरकुलाच्या योजनेची नीट अंमलबजावणी करावी , मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी संख्या वाढवावी या व अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर माननीय खोब्रागडे यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन केले.
   हे प्रेझेंटेशन मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांनी लक्षपूर्वक जवळपास अर्धा तास ऐकले व या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल आणि  पुन्हा महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून यामध्ये आणखी काय करता येऊ शकेल याबाबत सविस्तर मार्गदर्शन मुख्यमंत्री महोदयांनी केले. शरद पवार  यांनी यासाठी खास पुढाकार घेतला. त्यांनीही मुख्यमंत्री महोदयांना काही सूचना केल्या.मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रश्नांवर लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment

Pages