सामर्थ्य आहे चळवळीचे ,आंदोलनांचे,सर्व प्रकाच्या कार्यकर्त्यांचे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 15 March 2020

सामर्थ्य आहे चळवळीचे ,आंदोलनांचे,सर्व प्रकाच्या कार्यकर्त्यांचे

प्रासंगिक लेख
सामर्थ्य आहे चळवळीचे, आंदोलनांचे, सर्व प्रकारच्या कार्यकर्त्यांचे !
    - संजीव चांदोरकर
स्टेट बँकेने बचत खात्यांमध्ये “मिनिमम बॅलन्स” नसल्यास दंड आकारण्याची पद्धती मागे घेतली आहे

गेली काही महिने मुंबईचा मनीलाईफ ग्रुप, दिल्लीस्थित सीएफए संस्था व मुख्य म्हणजे बँक कर्मचाऱ्यांच्या ट्रेड युनियन्सनी बँकांनी हि दंड आकारण्याची पद्धत मागे घेण्यासाठी खूप मोठे आंदोलन चालवले होते

त्याला यश आले आहे; सर्वांचे अभिनंदन

एवढेच नाही तर आजच्या काळवंडलेल्या काळात आंदोलनांना यश येणे आपल्या सर्वांसाठी गरजेचे आहे
_____________________

बँकांना छोटे अकाउंट नको असतात, कारण त्यातून काहीही नफा होत नाही; मोठ्या रकमेचे अकाउंट किफायतशीर असतात.

परदेशी बँकां आणि भारतीय खाजगी बँकांनी हि मिनिमम बॅलन्सची टूम काढली; त्यामुळे कोट्यवधी गरीब  बँकांच्या लोक दरवाजाबाहेर राहिले

आधुनिक बँकिंगच्या गावकुसाबाहेर !

भारतात राहून “नॉन रेसिडंट” असणाऱ्या मॅनेजमेंट शिकलेल्या प्रोफेशनल्सनी सार्वजनिक बँकांच्या देखील “मिनिमम बॅलन्स” ची योजना गळी उतरवली
______________________

भारतातील कोट्यवधी कुटुंबे गेल्या पाच दहा वर्षात पहिल्यांदा बँकिंगच्या सेवा घेऊ लागली आहेत. त्यांना प्रोत्साहनपर योजना आखायच्या का मिनिमम बॅलन्सचे अडथळे उभे करायचे ?

भारतात पुढची अनेक वर्षे अजूनही सोशल बँकिंगची संपणार नाहीये; भारतातील ९० टक्के कुटुंबाना सार्वजनिक बँकांशिवाय कोणीही मित्र नाही

एकट्या स्टेट बँकेचे ४४ कोटी बचत अकाउंट आहेत; याचे अर्थ लावता आले पाहिजेत

सार्वजनिक बँका सामान्य नागरिकांशी पूर्वीसारख्या मित्रत्वाने वागतील याची काही गॅरंटी नाही; कारण त्यांच्यावर मार्केट परफॉर्मन्सची दडपणे आणली गेली आहेत

म्हणून बँकिंग सेवा घेणाऱ्या सामान्य लोकांनी संघटित झाले पाहिजे, मॅनिलाईफ, सीएफए सारख्या संस्था प्रयत्न करत आहेत त्यांना साथ दिली पाहिजे

No comments:

Post a Comment

Pages