प्रासंगिक - देशबांधवांनो कोरोनाची गंभीरपणे काळजी घ्या! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 19 March 2020

प्रासंगिक - देशबांधवांनो कोरोनाची गंभीरपणे काळजी घ्या!

प्रासंगिक


देश बांधवांनो कोरोनाची गंभीरपणे काळजी घ्या!
अफवा वर आळा घाला.
निष्काळजीपणाने राहू नका!
पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे!

    कोरोनाचे गंभीर सावट आपल्या देशावर आले आहे. आपली 137 कोटी लोकसंख्या आहे. कमी लोकसंख्या व श्रीमंत देशांनी सुद्धा हात टेकले आहेत.
 इटली ने कर्फ्यु लावण्यात खुप उशीर केला. 80 वर्षवर रुग्ण सोडून दिलेत. ज्या प्रमाणे चीनने केले ते इटली ने केले नाही. म्हणून इतके बळी नाहक गेलेत.
चीन नंतर इटली व इतर युरोपियन देश, इराण आता याच्या विळख्यात आहेत.
इटली मध्ये सध्या यातील ३ री स्टेज आहे, तर अमेरिकेत २ री स्टेज आहे. या स्टेजेस अशा की,
१ ली स्टेज - बाहेरून लागण होऊन केसेस येतात
२ री स्टेज - स्थानिक लागण सुरू होते
३ री स्टेज - कम्युनिटी(समाजात) लागण
४ थी स्टेज  - संपूर्ण साथ
आता भारतात बघू या: भारतात आपण १ ल्या स्टेज मधून २ र्या स्टेज मध्ये जात आहोत. ३ री स्टेज म्हणजे महाभयंकर अशी साथ पसरणे. (भारत सरकारचा प्रयत्न आहे की २ -या स्टेजलाच प्रसार थांबला पाहिजे.) परंतु बेशिस्त भारतीय नागरिक साथ देत नाहीत.
चीनने जगाला दाखवून दिले आहे की हा आजार फक्त आणि फक्त कर्फ्यु लावला तरच रोखला जाऊ शकतो. भारतात काय चालू आहे ? अजूनही सर्व शहरे सुरू आहेत, येणे जाणे, दळण वळण चालू आहे. ज्यांना लागण झाली आहेत असले पेशंट हॉस्पिटल मधून पळून जात आहेत (आणि मग इतरांना त्याची लागण करीत आहेत). आपण अजूनही समारंभ, जयंत्या, सोहळे साजरे करणे सोडलेले नाहीत. भेटीगाठी,
लक्षात घ्या ही राष्ट्रीय  आपत्ती आहे. देशाच्या व तुमच्या भविष्याचा विषय आहे. कृपया हे पण समजून घ्या की लसूण, कापूर, तपकीर, गोमूत्र,होम ,हवन यज्ञ याने हे विषाणू नष्ट होत नाहीत. ह्या विषाणूला जास्त तापमानात सुध्दा काहीच  होत नाही (दुबई, सौदी अरेबिया मधून लागण होऊन लोक आपल्याकडे आले आहेत. तिथे काय कमी तापमान आहे ?)
आणि इतर अफवा ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. स्वतःची योग्य काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. बाहेर न फिरणे हाच एकमेव उपाय आहे.
सुट्ट्या जाहीर केल्या याचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त घरात बसणे अपेक्षित आहे.

 भारतासाठी पुढील ३०-४५ दिवस अतिशय महत्वाचे आहेत. युद्धाचा प्रसंग आहे हा.

घरातच थांबून रहा. हात धुणे, तोंडाला रुमाल बांधणे, सार्वजनिक ठिकाणी जाणे नाही.

सरकार व जागतिक आरोग्य संघटना सांगेल ते पाळणे. तुम्हाला किंवा कोणाला लक्षणे दिसली तर लगेच सरकारी डॉक्टर चे निदर्शनास आणून द्या.

स्वत:ला घरी किंवा सरकारी हॉस्पिटल मध्ये अलगी करण / विलगी करण कक्षात दाखल व्हा.
हे गंभीर संकट आहार तरी काळजीपूर्वक वागा व हा मेसेज सर्वा पर्यन्त पोहचवा .तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात हे लक्षात घ्या.

No comments:

Post a Comment

Pages