नरहर कुरुंदकर सभागृह ,नांदेड येथे चर्चासत्र - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 12 March 2020

नरहर कुरुंदकर सभागृह ,नांदेड येथे चर्चासत्र

गुरूवारी(दि.१२)सायं ५ वाजता
नरहर कुरंदकर सभागृह , नांदेड येथे चर्चासत्र

नांदेड : लसाकम , बीसेफ , अण्णा भाऊ साठे साहित्य परिषद , मुक्ता साळवे महिला परिषद , सत्यशोधक समाज महासंघ , अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन , अण्णा भाऊ साठे सेवानिवृत्त कर्मचारी संघटना‌ या
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम नांदेड शहरात व जिल्ह्यात आयोजित करत आहेत. समाज जागृती व वैचारिक प्रबोधनाचे ध्येय घेऊन व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी या संघटनांचा प्रयत्न आहे.
   याचाच एक भाग म्हणून दि.१२ मार्च रोजी प्रा‌. डाॅ. सोमनाथ कदम, कणकवली यांनी लिहिलेला ग्रंथावर  चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.ते इतिहास विषयाचे वरीष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ते मातंग समाजाचे असून लसाकमचे  राज्य पदाधिकारी आहेत. त्यांचे "आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज "हे पाचवे पुस्तक.
या पुस्तकाच्या अनुषंगाने व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्यापक चर्चा घडवून आणावी या हेतूने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
   या चर्चासत्रात डाॅ. भालचंद्र कांगो, दिल्ली , रेखा ठाकूर,  मुंबई , किशोर जाधव, पुणे हे वक्ते सहभागी होणार आहेत.
    विविध परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांनी , समाज बांधवानी चर्चासत्रासाठी  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages