चिखली बु.वनक्षेत्रात ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त; यात बैल गाडीचा समावेश
किनवट : वन विभागाचे नियतन क्षेत्र चिखली (बु.ता.किनवट )मध्ये अवैध वृक्ष तोड करीत असताना साग नग सात किंमत ३० हजार रुपये व बैल गाडी किंमत १२ हजार रुपये असा एकूण ४२ हजार रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले.ही घटना काल(दि.११) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
या कारवाईत वनरक्षक डोईफोडे यांना आरोपीने मारहाण केल्याने ते जखमी झाले. घटनास्थळावरून आरोपी नामे शेख फारुख शेख कुरबान व शेख अफरोज शेख कुरबान हे बैलजोडी घेऊन पळून गेले,
सदरची कार्यवाही आशिष ठाकरे उपवनसंरक्षक, नांदेड, सहाय्यक वन संरक्षक, किनवट यांच्या मार्गदर्शन खाली के.एन. खंदारे,वनपरिक्षेत्र अधिकारी, किनवट,वनपाल के. जी. गायकवाड, सोनकांबळे , शेख फरीद , मांजळकर , यादव , वनरक्षक संभाजी घोरबांड, शहाजी डोईफोडे, अरुण चुकलवार, रवी दांडेगावकर, के. के. चिबडे, वाहन चालक बी. व्ही. आवळे, दांडेगावकर यांचा समावेश असलेल्या पथकाने पार पाडली.
No comments:
Post a Comment