महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ११ वर गेला आहे
मुंबई : राज्यात आतापर्यंत एकूण १० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनासंदर्भात प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या खबरदारीच्या उपायांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.१० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असले, तरी त्यांच्यामध्ये तशी गंभीर लक्षणं दिसत नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. १० पैकी ८ रुग्ण हे पुण्यातील आहेत. हे सर्वजण रुग्णालयात असून त्यांच्यापैकी काहींना झालेली बाधा ही सौम्य आहेत, असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.बीबीसीने ही बातमी दिली आहे.१ तारखेला दुबईहून जो ग्रुप आला त्यांच्याशी संबंधित व्यक्तींनाच कोरोनाच संसर्ग झाला आहे. त्यामुळे या सर्वांशी आम्ही संपर्क साधला आहे. ४० जणांच्या या ग्रुपमधील सर्वांनाच कोरोनाची लागण झालेली नाहीये, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेनं दोन रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ११ वर गेला आहे.
No comments:
Post a Comment