राहुल गांधींच्या विश्वासामुळे दिग्गजांना बाजूला सारत राजीव सातव राज्यसभेवर. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 12 March 2020

राहुल गांधींच्या विश्वासामुळे दिग्गजांना बाजूला सारत राजीव सातव राज्यसभेवर.

राहुल गांधींच्या विश्वासामुळे दिग्गजांना बाजूला सारत राजीव सातव राज्यसभेवर.

नवी दिल्ली : राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून राजीव सातव यांचं नाव निश्चित झालेलं आहे. या एका जागेसाठी मुकूल वासनिक, रजनी पाटील, सुशीलकुमार शिंदे यासह अनेक नावं चर्चेत होती. पण, अखेर राहुल गांधींच्या विश्वासातले राजीव सातव यांच्याच नावावर मोहोर उमटली आहे.
   राजीव सातव यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते गुजरातचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. २००९ मध्ये ते कळमनुरी मतदारसंघातून आमदार, तर २०१४ मध्ये हिंगोली मतदारसंघातून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. काँग्रेसमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी या दोघांच्याही विश्वासू गोटात असलेले जे मोजके नेते आहेत त्यात राजीव सातव यांचा समावेश होतो.
  ४५ व्या वर्षी त्यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. इतक्या कमी वयात, तेही काँग्रेससारख्या पक्षाकडून राज्यसभेवर जाण्याची संधी क्वचितच मिळाली आहे. एकीकडे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर आता राहुल ब्रिगेडमधल्या नेत्यांना वयाचा विचार न करता संधी मिळाल्याचं यानिमित्तानं दिसतं आहे.

No comments:

Post a Comment

Pages