किनवट : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांच्या नेतृत्वाखाली आज(दि.१२) सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याला सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच याप्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर सबंध भारत देशाचे दैवत आहेत. छत्रपती शिवरायांचा काळ हा भारताचा सर्वात वैभवशाली काळ होता.त्यांच्या काळामध्ये भारताचा जगात नावलौकिक झाला म्हणून छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन सबंध भारत देशाने वाटचाल करणे आवश्यक आहे.आज देशाला शिवराज्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे मत तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
या जयंती सोहळ्यात मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम पवार,शहराध्यक्ष सुनील ईरावार, शहर सचिव चंद्रकांत तम्मडवार, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष प्रसाद भंडारे, विध्यार्थी सेनेचे रोहित भिसे, नागेश मंत्रीवार, अनिल इरावार, कुलदीप मोहरे, मयूर रुणवाल, इलियास चौधरी, विजय माहुरकर, अजय ताकपेल्लीवार, सुरज लढे, चेतन रुणवाल, अविनाश कालसवार, आर्यन मोहरे, सुरज चव्हाण, ऋषिकेश दोनकोंडवार, विशाल शिंदे, दत्तू कर्दपवार, अजय पेंढारकर, गणेश कर्णेवाड, प्रशांत सातपल्लीवार, आदर्श रेड्डी, शंकर घोडाम, अजय, शुभम, निखिल, तथागत तसेच शिवसेनेचे तालुका अध्यक्ष बालाजी मुरकुटे,भाजपचे सुधाकर भोयर, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, माजी नगर सेवक सूरज सातूरवार, मारोती सुन्कलवाड, पंडित रासमवार, नितीन कावळे यांच्यासह पत्रकार, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Thursday, 12 March 2020

छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांची तिथीनुसार जयंती साजरी
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment