नीती आयोगाच्या वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडियाच्या यादीत भारतातील अव्वल शंभर महिलांमध्ये राजश्री पाटील यांची निवड
नांदेड: देशाच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी आणि महिला उद्योग, व्यवसाय व उपक्रमांना चालना देऊन औद्योगिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महिलांची निवड नीती आयोग, महिला उद्योजकता व्यासपीठा अंतर्गत वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या पुरस्कारासाठी करत असते. अनेक कसोट्या पार करीत देशातील विविध मान्यवर परीक्षकांच्या चाचणीतून देशभरातील २३०० महिलांची निवड शेवटच्या टप्प्यासाठी करण्यात आली होती. यातून देशातील अव्वल १०० महिलांची “ट्रान्सफॉर्मिंग इंडिया” ची यादी घोषित करण्यात आली. यामध्ये गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली.
केंद्र शासनाचे विकास धोरण ठरविणारी सर्वोच्च संस्था म्हणून नीती आयोग कार्य करते. पंचवार्षिक योजना राबविण्यामध्ये नीती आयोगाची भूमिका खूप महत्वपूर्ण असून, देशाच्या विकासाच्या दृष्टीने नवनवीन ध्येय धोरणे ठरविणे आणि ते अमलात आणणे यावर हि यंत्रणा काम करते. नीती आयोगाचा प्रमुख उपक्रम असलेल्या महिला उद्योजकता व्यासपीठ आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या सहकार्याने दरवर्षी देशातील १०० महिलांना वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडियाने गौरविण्यात येते. आपल्या उदोगाच्या मध्यमातून देशाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतीक बदलाकरिता स्वत:च्या कार्यातून सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या महिला उदोजकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. मा.रक्षामंत्री राजनाथ सिंहजी यांच्या हस्ते नीती आयोगाचे सिईओ अमिताभ कांत, सचिव ऑना राव यांसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला यात टॉप १५ महिला उदोजकांना पुरस्कृत करण्यात आले.
सन २०१९ च्या पुरस्कारासाठी "महिला उद्योजकता" हि संकल्पना समोर ठेवून देशाच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी पारंपरिक व्यवसायासोबत आणि बदलत्या परिस्थिती मध्ये येणाऱ्या आव्हानांना पार करत विविध औदोगिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या देशातील १०० महिलांना ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्य सुषमा स्वराज भवन नाविदिली येथे झालेल्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशातील अव्वल १०० महिलांमध्ये गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांची निवड करण्यात आली होती. ही महाराष्ट्रासाठी सन्मानाची बाब आहे. राजश्री पाटील यांचे बचत गट, सहकार, सामाजिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान पाहून त्यांच्या कार्याची दखल घेत २०१९ च्या १०० महिलांच्या यादीत निवड करण्यात आली.
Thursday, 12 March 2020

Home
जिल्हा
नीती आयोगाच्या वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडियाच्या यादीत भारतातील अव्वल शंभर महिलांमध्ये राजश्री पाटील यांची निवड
नीती आयोगाच्या वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडियाच्या यादीत भारतातील अव्वल शंभर महिलांमध्ये राजश्री पाटील यांची निवड
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment