आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा , रक्तदान करून मानव धर्म पाळावा - फुले शाहू आंबेडकर युवा मंचचे संस्थापक स्वप्नील नरबाग यांचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 23 March 2020

आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा , रक्तदान करून मानव धर्म पाळावा - फुले शाहू आंबेडकर युवा मंचचे संस्थापक स्वप्नील नरबाग यांचे आवाहन

आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा ,
रक्तदान करून मानव धर्म पाळावा -  
   फुले शाहू आंबेडकर युवा मंचचे संस्थापक स्वप्नील नरबाग यांचे आवाहन





 नांदेड : आजच्या विज्ञान युगात झपाट्याने शोध लागत असले तरी अजूनही शास्त्रज्ञांना कृत्रिम रक्त तयार करण्यात  यश आलेले नाही. मानवाला आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. एका मानवाचे रक्त दुसऱ्या गरजू मानवास रुग्णास चालते. अपघातात रक्तस्त्राव,  शस्त्रक्रिया  प्रसूतीपश्चात रक्तस्त्राव, रक्ताचा कर्करोग इतर गंभीर आजारांमध्ये रुग्णांना रक्ताची गरज भासते.  त्यावेळी रक्त मिळाले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी रक्तदात्यांचे रक्त  दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकतात.



    महाराष्ट्रात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ७० ते ७५ टक्के बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून  भागविली जाते.  आता  ऐच्छिक   रक्तदानाची  गरज समजून घेणे गरजेचे चे आहे
रक्त न मिळाल्यामुळे   मृत्यूचे प्रमाण घरात १५ ते २० टक्के आहे. केवळ पॉईंट  ०.६% रक्तदान करतात.
 महाराष्ट्रात  २९७  रक्तपेढया  मधून रुग्णांना रक्त पुरवठा केला जात असला तरी रक्ताचा तूटवडा भरून निघावा.एक एकट्याने जाऊन काळजीपूर्वक रक्तदान करावे,असे आवाहन फुले शाहू आंबेडकर युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील नरबाग  यांनी केले आहे .

२०१३ पासून दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर घेत आहोत,असेही त्यांनी यावेळी सांगितलं आहे .

No comments:

Post a Comment

Pages