जमावबंदीला ही नागरिक जुमानेना ; रात्री संचारबंदी लागू. कोरोना च्या पाश्र्वभूमीवर शासनाची कठोर उपाययोजना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 23 March 2020

जमावबंदीला ही नागरिक जुमानेना ; रात्री संचारबंदी लागू. कोरोना च्या पाश्र्वभूमीवर शासनाची कठोर उपाययोजना

जमावबंदीला ही नागरिक जुमानेना ; रात्री संचारबंदी लागू. कोरोना च्या पाश्र्वभूमीवर शासनाची कठोर उपाययोजना

किनवट :कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन घोषित करुन व जमाव बंदीचा आदेश देऊनही सोमवारी (दि.२३)शहरात व परिसरात नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहेत.नागरिकांनी अजुनही कोराना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सूचना गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही.शहर परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहने व नागरिक फिरताना दिसत आहेत.यावर कठोर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याचे जाहीर केले.
   किनवट शहराची लोकसंख्या जवळपास ४० हजार आहे,तसेच शहराला लागून असलेल्या व किनवटचे उपनगर समजल्या जाणाऱ्या गोकुंदा ग्रामपंचायतीची लोकसंख्या २० हजाराच्या जवळपास आहे.या दोन लोकसंख्या मिळून ६० हजाराच्या आसपास ही लोकसंख्या आहे.अत्यावशक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नका,असे आदेश असतांना ही लोकं विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यावर ये-जा करीत आहेत व रस्त्यावर गर्दी करीत आहेत.
       तालुका प्रशासन हे सकाळपासूनच शहरात फिरुन परिस्थितिचा आढावा घेत आहे.प्रशासनाचे वाहने गेली की, पुन्हा लोक गर्दि करीत आहेत.शहरातील अत्यावशक सेवा सुरू आहेत.तसेच जिवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु आहेत.तालुका प्रशासनातील सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नरेंद्र देशमुख,नगर परिषदेचे अध्यक्ष आनंद मच्छेवार, मुख्याधिकारी निलेश शेट्टी सुंकेवार,नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे, पोलिस निरीक्षक मारोती थोरात हे शहरात फिरून परिस्थिचा आढावा  घेत आहेत. प्रभारी उपविभागिय पोलिस अधिकारी विलास जाधव व पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहर व परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.
शहरातील शिवाजी चौक, जिजामाता चौक,अशोक स्तंभ चौक, पंचायत समिती चौक,रेल्वे स्टेशन, बसस्थानक,डाॅ.आंबेडकर चौक या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
   दरम्यान,आज(ता.२३) ३१ तारखेपर्यंत बंद जाहीर केलेला असतांनाही दुकाने चालुच ठेवणा-या चार जणांविरुद्ध सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार नगर परिषदेचे कर्मचारी किरण कोलगुटवार व तौफिक खान यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात शेख मुनवर शेख हैदर(जेबा स्टेशनरी),राम गोविंद बावने(ओम इलेक्ट्रॉनिक), गोविंद भिकू चव्हान(तंबाखू दुकान) व सुभाषनगर येथील नौशाद खान महेबुब खान(फर्निचर दुकान) यांचा समावेश आहे.तर, यापूर्वि चार जणांविरुद्ध शनिवारी (ता.)२१ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.आता एकूण गुन्ह्यांची संख्या आज आठ झालेली आहे.

No comments:

Post a Comment

Pages