राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या शंभराच्यावर ; ग्रामीण भागातही रुग्ण, चिंतेत वाढ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 24 March 2020

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या शंभराच्यावर ; ग्रामीण भागातही रुग्ण, चिंतेत वाढ

राज्यातील कोरोनाबाधितांची  संख्या शंभराच्यावर ; ग्रामीण भागातही रुग्ण, चिंतेत वाढ
मुंबईः राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी पार केली असून आज पुण्यात ३ तर साताऱ्यात एक असे ४ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०१ झाली आहे. प्रारंभी महाराष्ट्राच्या शहरी भागातच आढळून आलेलेले कोरोनाग्रस्त आता ग्रामीण भागातही आढळून येऊ लागले आहेत. ही राज्याच्या दृष्टिने चिंतेची बाब आहे.

 पुण्यामध्ये आढळून आलेल्या तिघांपैकी दोघांचा परदेशी दौरा केल्याचा इतिहास नाही. परदेशातून न आलेल्या नागरिकांतही कोरोना विषाणु परसत चालला आहे, ही प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. हे दोघे कोणाच्या संपर्कात आले होते, याबाबतची माहिती गोळा करण्यात येत आहे.


राज्यातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे. संपूर्ण राज्यभर जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहे. तसेच देशांतर्गत विमानसेवाही बंद करण्यात आली आहे. एवढे करूनही मुंबई- पुण्यासह महाराष्ट्राच्या अन्य शहरातील अनेक नागरिकांच्या लक्षात अद्यापही कोरोनाच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात आलेले दिसत नाही. ते बेपर्वाईने वागत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. त्यांची ही बेपर्वाई कोरोनाचा फैलाव आणखी झपाट्याने होण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Pages