महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११६ वर,सांगलीत एकाच कुटुंबातील ५ जण कोरोनाग्रस्त
मुंबईः महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. आज सांगलीतील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मुंबईत ४ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रात आज कोरोना संसर्गाची बाधा झालेले ९ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सांगलीतील पाच जण एकाच कुटुंबातील आहेत तर मुंबईत आढळलेल्या ४ नवीन रूग्ण प्रवास इतिहास अथवा संसर्गातून बाधित झाले आहेत, असे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.
विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे कोरोनाची बाधा झालेले १४ रुग्ण या संसर्गातून पूर्णतः बरे झाले असून त्यांना आज रूग्णालयातून सुटी देण्यात येत असल्याची माहितीही टोपे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी ट्विट करून दिली आहे.
No comments:
Post a Comment