संपूर्ण महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत लाॅकडाऊन !
मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांच्या संयम आणि संकल्पाची कसोटी पाहण्यासाठी केंद्र सरकार आज राबवत असलेला जनता संचारबंदीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव असलेली ७५ शहरे पूर्णतः लॉकडाऊन करा, असा सल्ला केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिला आहे. या सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच केली. संपूर्ण महाराष्ट्रात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने सुरू करण्यात आली आहे. राजस्थान आणि पंजाब या दोन राज्यांनी आजच लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
आजपासून ३१ मार्चपर्यंतच्या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शहरी बसेस मर्यादित स्वरूपात चालू राहतील. सरकारी कार्यालयात केवळ 5 टक्के कर्मचारी काम करतील. दूध भाजीपाला दुकानं, मेडिकल, बँक चालू राहणार, असे सांगतानाच गरज पडल्यास ३१ मार्चनंतरही महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचाः मालगाड्या वगळता देशभरातील सर्व रेल्वे ३१ मार्चपर्यंत बंद!
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने जनता संचारबंदीचा प्रयोग राबवत असतानाच काही कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मुंबई, कोलकात्यातील लोकलसह देशभरातील सर्व प्रवाशी रेल्वे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांचा संपर्क टाळणे हाच कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा प्रभावी उपाय असल्याने केंद्र सरकार हळूहळू लॉकडाऊनच्या दिशेने पावले टाकत आहे. त्यामुळेच देशातील ज्या ७५ शहरांत कोरोनाग्रस्त रूग्ण आढळले आहेत, ती शहरे पूर्णतः लॉकडाऊन करण्याचा सल्ला केंद्राने राज्यांना दिला. राजस्थान आणि पंजाब या दोन राज्यांनी आजच लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर आता महाराष्ट्रानेही लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
Sunday, 22 March 2020

संपूर्ण महाराष्ट्रात 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन!
Tags
# महाराष्ट्र
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment