बँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा
नांदेड : आर्थिक वर्षाचा शेवट, PMFBY चे दोन हजार रुपये व महिलांसाठी पाचशे रुपये ग्राहकांच्या खात्यावर जमा होणार असून कोरोना (कोव्हिड 19) संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने बँकेतील गर्दी कमी करुन ग्राहकांनी बँक ग्राहक सेवा केंद्राचा वापर करावा, असे आवाहन नांदेड जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक यांनी केले आहे.
कोव्हिड 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कलम 144 लागू असल्याने जीवनावश्यक सेवा चालू राहण्यासाठी मुभा दिली आहे. यात ग्राहक सेवा केंद्राचा समावेश करण्यात आलेला आहे. ग्राहक सेवा केंद्रामार्फत 10 हजार रुपये काढणे व 20 हजार रुपये भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहक सेवा केंद्राचा वापर केल्यास ग्राहकांची गैरसोय होणार नाही.
ग्राहक सेवा केंद्रांनी बँक सेवा देतांना शासनाच्या निर्देशाचे योग्य पालन करावे. बँकांनी सीएसपी यांना योग्य ओळखपत्रे तसेच स्टिकर्स दयावीत. बँकांनी लाभार्थ्यांना पैसे वाटप करण्यासाठी स्थानिक संस्था, लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे. लाभार्थ्यांची यादी गावानुसार प्रसिद्ध करुन योग्य लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना सेवेचा लाभ दयावा.
बॅंक ऑफ बडोदानी ग्राहक सेवा केंद्रासाठी 2 हजार रुपये वितरीत केले. जेणेकरुन ग्राहक सेवा केंद्र परिसर स्वच्छ ठेवून शासनाच्या आदेशाचे पालन होईल. ग्राहक सेवा केंद्र चालू राहण्यासाठी प्रोत्साहनपर शंभर रुपये प्रतिदिन देण्यात येणार आहेत. याप्रमाणे इतर बँकांनी ग्राहक सेवा केंद्रांना स्वच्छता व सेवेसाठी योग्य ती तरतूद करुन ग्राहकांची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आवाहन नांदेड जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापन यांनी केले आहे.
Tuesday 31 March 2020
बँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी ग्राहक सेवा केंद्राचा वापर करावा
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment