स्वा रा ती म नांदेड विद्यापीठ महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी अक्षय कांबळे यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 14 March 2020

स्वा रा ती म नांदेड विद्यापीठ महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी अक्षय कांबळे यांची निवड

स्वा रा ती म नांदेड विद्यापीठ महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी अक्षय कांबळे यांची निवड


दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा स्वा रा ती म विद्यापीठ नांदेड येथे आयोजित केला आहे.
त्या निमित्य जयंती समितीची मिटिंग दि 14 मार्च रोजी डॉ.हर्षवर्धन दवणे,स्वप्नील नरबाग,प्रा.सतीश वागरे, प्रकाश दिपके,प्रा.शशिकांत हटकर,डॉ.रवी सूर्यवंशी  यांच्या मार्गदर्शना खाली विद्यापीठात बैठक घेण्यात आली त्यामध्ये अध्यक्षपदी अक्षय कांबळे यांनी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
 तर उपाध्यक्ष -मारोती बरमे व अश्विनी केवटे, सचिव-अनुपम सोनाळे, सहसचिव -शीतल नांगरे व किरण फुगरे ,कोषाध्यक्ष-संदीप जोंधळे, कार्याध्यक्ष-राहुल सोनाळे,सांस्कृतिक प्रमुख-तेजस्विनी कांबळे, अश्विनी गाडगे,प्रसिद्धीप्रमुख-मनोहर सोनकांबळे  सदस्य-दीक्षा इंगोले,शिवनंदा वाघमारे ,शुभम वाघमारे, कपिल गायकवाड,शंतनु बनसोडे    यांची निवड करण्यात आली आहे.
      11 एप्रिल ते 13 एप्रिल च्या दरम्यान व्याख्यान ,कवी संम्मेलन निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, महापुरुषांवर आधारित सामान्यज्ञान स्पर्धा,शाहिरी जलसा 18 तास अभ्यास असे विविध उपक्रम घेण्यात येणार आहे अशी माहिती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय कांबळे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Pages