गर्दी कमी करा,अन्यथा काही कठोर निर्णय घ्यावे लागतील - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 29 March 2020

गर्दी कमी करा,अन्यथा काही कठोर निर्णय घ्यावे लागतील - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

गर्दी कमी करा,अन्यथा  काही कठोर निर्णय घ्यावे लागतील  - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे



मुंबईः गेले काही दिवस तुम्ही संयम आणि जिद्दीचे अतुलनीय दर्शन घडवले आहे. परंतु अद्यापही काही लोक अनावश्यक बाहेर पडत आहेत. गर्दी करत आहेत. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने तुमच्या सोयीसाठी २४ तास उघडी ठेवण्यात आली आहेत. परंतु दुकानांवरील गर्दी कमी करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

फेसबुक आणि ट्विटर लाइव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात जीवनावश्यक वस्तुंचा अजिबात तुटवडा नाही. तुमच्या सोयीसाठी आपण चोवीस तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवली आहेत. परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानातील गर्दी कमी झाली नाही तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. या लढाईत पुढची पावले उचलावी लागली तर तीही उचलू. बाहेरची लढाई लढण्यासाठी तुमचे सरकार भक्कम आहे. तुम्ही घरातच रहा, बाहेर पडू नका, असे ठाकरे म्हणाले.

गेले आठ दिव तुम्ही संयम दाखवला. पण अजूनही काही लोक अनावश्यक बाहेर पडत आहेत. मग पोलिसांशी कुठे तरी हुज्जत होते. पोलिस सर्व भार स्वतःवरती घेत आहेत. तुम्ही संयमाचे अतुल्य दर्शन घडवत आहातच. पण काही वस्त्यांमध्ये वर्दळ होत आहे. ती कमी करा. ही आणीबाणी आहे. सरकारला कठोर निर्णय घ्यायला लावू नका, असे ठाकरे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Pages