राजाभाऊ चाडावर विचारमंच च्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 4 March 2020

राजाभाऊ चाडावर विचारमंच च्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन

राजुभाऊ चाडावार विचारमंचच्या वतीने मोफत
सर्वधर्मिय सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन.

किनवट : लग्नातील अवाढव्य खर्चाला आळा बसावा तसेच सर्व समाज एका छत्राखाली एकत्र यावा, या उद्दात हेतूने (स्व.) राजूभाऊ गजानन चाडावार विचारमंच, किनवटच्या वतीने येथे प्रथमच निशुल्क सर्वधर्मिय सामूहिक विवाह मेळाव्याचे दि.२६ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे.
     रविवारी(दि.२६) साईबाबा मंदिरासमोरील कृष्णप्रिय गोशाळा परिसरात हा मेळावा मोठ्या थाटात साजरा होणार आहे.या मेळाव्यात जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुला मुलींची नोंदणी करून लग्नकार्य पार पाडावे, असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
   हा मेळावा पूर्णतः नि:शुल्क असून मेळाव्यात लग्न करणाऱ्या मुला मुली कडून कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क अथवा अन्य शुल्क घेण्यात येणार नाही. विशेष म्हणजे वधू वरासाठी लागणारे मनी, मंगळसूत्र, जोडवे, ड्रेस, साडी इत्यादी वस्तू तसेच भोजन आयोजन समितीच्या वतीने देण्यात येणार आहे.
    किनवट येथील साईबाबा मंदिरासमोरील कृष्णप्रिय गो शाळेच्या परिसरात अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे ता.२६ एप्रिल रोजी रविवारी दुपारी १२:३० वाजता.हा भव्य मेळावा संपन्न होणार आहे. किनवट व परिसरातील सर्वधर्माच्या पालकांनी आपापल्या मुला मुलींचे लग्न जुळऊन या मोफत सामूहिक विवाह मेळाव्यात लग्नकार्य पार पाडावे. नोंदणीसाठी व मेळाव्यातील सोयी सुविधाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 9822001088,9822663211,9850631991या मो.क्र.वर संपर्क करावा अथवा प्रत्यक्ष भेटावे, असे आवाहन आयोजक (स्व.)राजूभाऊ गजानन चाडावार विचारमंचने केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages